शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकटात ही कंपनी 20 हजार महिलांना देणार रोजगार, दीड लाखांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 08:33 IST

वर्षाच्या अखेरीस 20,000 शिक्षकांची भरती करण्याची त्यांची योजना आहे, अर्थात यावर्षी आणखी 13,000 शिक्षकांची भरती करण्याची कंपनीचा मानस आहे. 

कोरोना संकटाच्या काळात पदवीधर आणि पदव्युत्तर महिलांसाठी एक चांगली बातमी आहे. एडटेक स्टार्टअप व्हाइटहॅट जुनियर (WhiteHat Jr)ने म्हटले आहे की, ते आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील महिला शिक्षकांची संख्या वाढवित आहेत. कंपनी प्लॅटफॉर्मवर दररोज 220 शिक्षकांना जोडत आहे. आतापर्यंत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 7,000 पेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहे. वर्षाच्या अखेरीस 20,000 शिक्षकांची भरती करण्याची त्यांची योजना आहे, अर्थात यावर्षी आणखी 13,000 शिक्षकांची भरती करण्याची कंपनीचा मानस आहे. अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढतीचव्हाइटहॅट जुनियरला अलीकडेच बीजू(Byju's) यांनी विकत घेतले होते. व्हाइटहॅट ज्युनियर म्हणाले की, त्यांचे भारत (India), अमेरिका (US), कॅनडा (Canada), ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर अधिक शिक्षकांची आवश्यकता आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, त्याच्या प्लॅटफॉर्मवर  शिक्षकांची संख्या वाढत आहे. कंपनीने म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे डिजिटल शिक्षण आणि शिक्षणाच्या पद्धतींमध्ये नवीन प्रयोग करण्यात येत आहेत.पालक ऑनलाइन शिकण्यास पूर्णपणे पाठिंबा देत आहेतव्हाइटहॅट ज्युनियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण बजाज म्हणाले की, पालकांनीही ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. मुलांच्या शिक्षणाच्या या नवीन दृष्टिकोनास पालक पूर्णपणे पाठिंबा देत आहेत. सध्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित 84 टक्के शिक्षकांचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आहे. ते घरी मुलांना शिकवत आहेत आणि दरमहा सरासरी 50,000 ते 1.5 लाख रुपये कमवत आहेत. बहुतेक शिक्षकांकडे पदव्युत्तर पदवी आहेत. या कंपनीची स्थापना 2018 मध्ये झाली होती.