शनिपेठेत मध्यरात्री घरफोडी २० हजाराचा ऐवज लंपास : दिवसभरात पंचनामा झालाच नाही
By admin | Updated: March 13, 2016 00:03 IST
फोटो-४७, ४८,५०
शनिपेठेत मध्यरात्री घरफोडी २० हजाराचा ऐवज लंपास : दिवसभरात पंचनामा झालाच नाही
फोटो-४७, ४८,५०जळगाव : शनिपेठेतील गुरुनानक नगरात शनिवारी पहाटे चोरट्यांनी संदीप धनसिंग चावरीया यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने असा २० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर नाईट पेट्रोलिंगला असणार्या पोलिसांनी घटनास्थळाला पहाटे चार वाजता भेट दिली, परंतु संध्याकाळी उशिरापर्यंतही पंचनामाही झालेला नव्हता.संदीप व महेंद्र करोसिया हे दोन्ही भाऊ व त्यांची आई पुनाबाई करोसिया हे तीघं जण शेजारी असलेल्या घरात झोपले होते. संदीप याला अकोट येथे जायचे होते, त्यामुळे चार वाजता रेल्वे स्टेशनवरुन एक्सप्रेस असल्याने तो लवकर उठून या घरात शौचासाठी आला असता त्याला घराचे कुलूप तुटलेले व घरात सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसला. त्याने तातडीने आई व भावाला बोलावले. कपाटातील लॉकर तोडण्यात आले होते. त्यातील पत्र्याच्या पेट्या फोडण्यात आल्या होत्या. एका पेटीमधील चार हजार तर दुसर्या पेटीमधील तीन हजार रुपये रोख व अन्य पिशवीतील तीन हजार रुपयांची चिल्लर, हनुमानाचा चांदीचा मुकूट, सोन्याचे मनी चोरी झाले होते.वडीलांच्या निधनापासून घर बंदचोरी झाली त्या घरात संदीपे वडील झोपायला येत होते.मात्र सात डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले ते घर रात्री बंदच राहत होते. अतिशय दाट वस्तीत हे घर आहे. पहिल्यांदाच या परिसरात चोरीचा प्रकार घडला. दरम्यान, चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी पहाटे चार वाजता पाहणी केली व सामानाला कोणीच हात लावू नका, पंचनामा करावा लागेल म्हणून परिवाराला सांगितले, परंतु संध्याकाळपर्यंत एकही कर्मचार्याने तिकडे फिरकून पाहिले नाही. त्यामुळे सामान तसाच पडून होता.