शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आयुष्मान भारत’ योजनेत मध्यमवर्गीयांचाही समावेश व्हावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 04:26 IST

केंद्र सरकारने सुरू केलेली आयुष्मान भारत योजना ही अधिक व्यापक करून त्यामध्ये मध्यमवर्गीयांचा समावेश करावा

केंद्र सरकारने सुरू केलेली आयुष्मान भारत योजना ही अधिक व्यापक करून त्यामध्ये मध्यमवर्गीयांचा समावेश करावा, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र अधिक सक्षम करावीत. वैद्यकीय शिक्षणासाठी अधिक सोयी-सवलती उपलब्ध व्हाव्यात, अशा अपेक्षा आहेत.सरकारने आरोग्य खात्यासाठीच्या निधीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ग्रामीण भागामध्ये अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकारने देशातील गरिबांसाठी आयुष्मान भारत ही योजना सुरू केली आहे. आता या योजनेची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे केवळ दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी ही योजना न ठेवता, त्यामध्ये मध्यमवर्गीयांचा समावेश करून अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत योजनेच्या खर्चाची रक्कमही वाढवून मिळण्याची अपेक्षा आहे.ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य सेवा ही अतिशय दयनीय आहे. या सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांचा दर्जा सुधारून त्यांना वेलनेस क्लिनिकचे स्वरूप मिळावे, यासाठी सरकारने योजना आखणे हे अतिशय गरजेचे आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळणे गरजेचे असून, त्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये काही योजना होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे या केंद्रांमध्ये प्रशिक्षित डॉक्टरांची नेमणूक केली जावी, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये चांगली आरोग्य सेवा सहज उपलब्ध होऊ शकेल. आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील अनेक कर्मचारी हे अर्धवेळ असून, त्यांना पुरेसे मानधन दिले जात नाही. या कर्मचाºयांना योग्य तो मोबदला मिळावा, यासाठी जास्तीची तरतूद करण्याची गरज आहे. सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला असला तरी, सरकारने आरोग्य क्षेत्रासाठीची तरतूद कमी करू नये, एवढीच अपेक्षा आहे.- डॉ. श्याम अष्टेकर, नाशिक(लेखक एसएमबीटी कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.)वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवावीवैद्यकीय शिक्षणासाठी सरकारने अधिक सुविधा उपलब्ध करून देतानाच या शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. देशात डॉक्टरांची संख्या कमी असून, त्यांचा तुटवडा कमी व्हावा यासाठी अधिक वैद्यकीय महाविद्यालये निर्माण व्हावीत. त्याचप्रमाणे सध्याच्या महाविद्यालयांची गुणवत्ता वाढावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होण्याची गरज आहे. वैद्यकीय महाविद्यालये आणि आरोग्य सेवा यांनी हातामध्ये हात घालून काम केल्यास देशाच्या आरोग्याचा प्रश्न बºयाच प्रमाणामध्ये मार्गी लागू शकेल, अशी आशा वाटते.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतBudget 2019अर्थसंकल्प 2019