शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

माध्यान्ह आहार योजनेत दोन दिवस देणार दूध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:23 IST

देशातील दूध उत्पादक सध्या अडचणीत आहेत. महाराष्ट्रातील उत्पादकांनी गेल्याच आठवड्यात दर वाढवून देण्यासाठी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव पुढे आला आहे.

नवी दिल्ली : देशात उपलब्ध असलेल्या अतिरिक्त दुधाचा सदुपयोग व्हावा व दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही दूधाला किफायतशीर दर मिळावा यासासाठी शाळांच्या माध्यान्ह आहार योजनेत व आंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन दिवस दूध देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने केला असून बहुतांश राज्यांनी त्यास अनुकुलता दर्शविली आहे.देशातील दूध उत्पादक सध्या अडचणीत आहेत. महाराष्ट्रातील उत्पादकांनी गेल्याच आठवड्यात दर वाढवून देण्यासाठी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव पुढे आला आहे.केंद्रीय पशुपालन व दुग्धोत्पादन खात्याचे सचिव तरुण श्रीधर म्हणाले की, अतिरिक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे संकलन करून ते शाळा व आंगणवाडयांना माध्यान्ह आहार योजनेसाठी पुरविण्याची व्यवस्था करावी, असे आम्ही राज्यांना सुचविले आहे.नियोजनाचा अभाव- या खात्याचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की, आत्तापर्यंत दुधाचे उत्पादन वाढविण्यावरच भर दिला गेला. परंतु उत्पादित दुधाला कायमस्वरूपी मागणी तयार होईल, याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही.- भारतात दुधाचा दरडोई वापर वर्षाला ३३०ग्रॅम या जागतिक सरकारीहून जास्त आहे. यात आणखी वाढ करण्यास वाव आहे.सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वित्तीय वर्षात देशातील दुधाचे उत्पादन ६.६ टक्क्यांनी वाढून १७६. ३५ दशलक्ष टनांवर पोहोेचले. सन २०२१-२२ पर्यंत ते आणखी वाढून २५४.५ दशलक्ष टनांवर जाईल, असा अंदाज आहे.श्रीधर म्हणाले की, राजस्थान सरकारने यासाठी लगेच तयारी दर्शविली आहे. खरे तर सर्वच राज्ये यासाठी अनुकूल आहेत. फक्त पुरवठा कसा करायचा याची खात्रीशीर व्यवस्था ठरवावी लागेल. शाळांना दूध पुरवायचे की दूधभुकटी या पर्यायांचे सोयीच्या दृष्टीने मूल्यमापन करावे लागेल.दुधाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्याखेरीज इतरही काही अल्पकालीन उपाय सरकारने योजले आहेत. मात्र सध्यासारखी परिस्थिती पुन्हा उद््भवू द्यायची नसेल तर त्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे.- तरुण श्रीधर,केंद्रीय पशुपालन व दुग्धोत्पादन खात्याचे सचिव

टॅग्स :Schoolशाळाmilkदूध