शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
3
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
4
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
5
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
6
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
7
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
8
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
9
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
11
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
12
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
13
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
14
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
15
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
16
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
18
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
19
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'

1987च्या आधी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार, केंद्रातल्या अधिकाऱ्याची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 10:00 AM

1987च्या पूर्वी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार असल्याचं केंद्रातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

नवी दिल्लीः 1987च्या पूर्वी जन्मलेल्यांना भारतीय नागरिक समजलं जाणार असल्याचं केंद्रातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. तसेच ज्यांचे आई-वडील 1987पूर्वी भारतात जन्मलेले असल्यास त्यांना प्रामाणिक भारतीय नागरिक (Bona Fide Indian Citizens) मानलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, नागरिकत्व सुधारणा कायदा 2019वरून चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. तसेच देशात लागू होणाऱ्या नॅशनल रजिस्‍ट्रार ऑफ सिटिजन्स (NRC)बद्दलही नागरिकांनी घाबरून जाऊ नये.  नागरिकत्व कायद्या(Citizenship Act)मध्ये 2004ला संशोधन करण्यात आलं होतं. आसाम सोडल्यास इतर कोणत्याही राज्यात आई-वडिलांपैकी कोणतीही एक व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि ते अवैध निर्वासित (Illegal Immigrant) नसल्यास त्यांच्या मुलांना भारतीय नागरिकत्व बहाल केलं जातं. या कायद्यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. ज्यांचे आई-वडील 1987पूर्वी देशात जन्मलेले आहेत, त्यांना भारतीय नागरिकच समजलं जाणार आहे. आसाममध्ये ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आसाम करार 1971 करण्यात आला होता.  एनआरसी-1 आणि एनआरसी-2मध्ये कोणाचा होणार समावेश26 जानेवारी 1950नंतर आणि 1 जुलै 1987च्या आधी जे भारतात जन्माला आलेले आहेत, त्यांचा एनआरसी-1 (NRC-1)मध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर 1 जुलै 1987 नंतर आणि 3 डिसेंबर 2004पूर्वी भारतात जन्माला आलेल्यांना एनआरसी-2मध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. ज्यात आई-वडिलांपैकी एकाला भारतीय असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. 3 डिसेंबर 2004ला किंवा त्यानंतर भारतात जन्माला आलेल्या आणि ज्यांच्या आई-वडिलांपैकी कोणतीही एक व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि ते अवैध निर्वासित (Illegal Immigrant)नसल्यास त्यांना भारतीय समजलं जाणार आहे.  3 डिसेंबर 2004नंतर जन्माला आलेल्या मुलांच्या आई-वडिलांना हे करावं लागणार 3 डिसेंबर 2004 किंवा त्यानंतर जन्माला आलेल्यांना एका अटीवर भारतीय नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. त्या मुलांच्या आई-वडिलांना दुसऱ्या देशाचा पासपोर्ट नसल्याचं दाखवावं लागणार आहे. तसेच जन्माच्या वर्षभरातच भारतीय दूतावासात मुलाची जन्मनोंदणी केल्याचं सिद्ध करावं लागणार आहे. अशात जन्म दाखला (Birth Certificate) किंवा म्‍युनिसिपल सर्टिफिकेट (Municipal Certificate) नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. 1971च्या आधी जन्मलेल्या भारतीय नागरिकाला जन्मदाखला किंवा वंश परंपरागत पुरावे दाखवण्याची गरज नसल्याचंही केंद्रातल्या गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक