शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांसाठी पुढील ३-४ आठवडे चिंता वाढविणारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 05:59 IST

तज्ज्ञांचे मत, सुरुवातीला झपाट्याने वाढणार रुग्णसंख्या. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये ओमायक्राॅनच्या १० पैकी एकाच रुग्णामध्ये लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे जास्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील २४ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये अडीच हजारांहून अधिक  ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये अतिशय झपाट्याने काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून पुढील ३ ते ४ आठवडे महानगरांची चिंता वाढविणारे राहणार आहेत. त्यानंतर मात्र रुग्णांच्या संख्येत घट दिसून येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये ओमायक्राॅनच्या १० पैकी एकाच रुग्णामध्ये लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे जास्त रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही. मात्र, ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना जास्त धाेका राहणार आहे. महानगरांमध्ये लाट ओसरू लागताच छाेट्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. सुरुवातीला अतिशय झपाट्याने रुग्णसंख्या वाढते, असा ओमायक्राॅनचा पॅटर्न आहे. 

डेल्टा व्हेरिएंटने आणलेल्या लाटेच्या तुलनेत देशभरात सध्या जास्त सज्जता आहे. राज्यांना १.१४ लाख ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्स पुरविण्यात येत आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठीही उपाययाेजना करण्यात येत आहेत. विषाणू सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे ओमायक्राॅनशी लढण्यासाठी लाॅकडाउनचा काहीही उपयाेग नाही. 

दिल्लीत सध्या लाॅकडाऊन नाही    दिल्लीत गेल्या २४ तासांमध्ये काेराेनाचे तब्बल १५ हजार ९७ नवे रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर दिल्लीत रात्रीची संचारबंदी, शनिवार आणि रविवारी संपूर्ण संचारबंदीसह काही निर्बंध लावण्यात आले आहेत.     रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले बेड्स, आयसीयूतील उपलब्धता त्यामुळे सध्या लाॅकडाउन लावण्याची गरज नसल्याचे दिल्लीचे आराेग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.     राज्यात माेठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. मात्र, हे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इटलीतून आलेले १२५ प्रवासी काेराेना पाॅझिटिव्हपंजाबच्या अमृतसर विमानतळावर इटलीहून दाखल झालेल्या एका खासगी विमानातील १२५ प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विमानतळ संचालक व्ही. के. सेठ यांनी याबाबत माहिती दिली. विमानात १७९ प्रवासी होते. पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना अमृतसरमधील रुग्णालयांमध्ये संस्थात्मक विलगीकरणासाठी पाठवले जाणार आहे. सर्व प्रवाशांची इटलीमध्ये कोविड टेस्ट निगेटिव्ह आली हाेती. मात्र, नियमानुसार त्यांची भारतात दाखल झाल्यावर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. 

अमृतसर येथे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रवाशांनी शंका उपस्थित केली. आपल्याला साेडून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी प्रवाशांनी केल्यामुळे विमानतळावर काही काळ तणाव निर्माण झाला हाेता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या