शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशात प्रथमच पाण्याखालून धावणार मेट्रो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:32 IST

पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्प्लनेड-हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

कोलकाता : देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उद्घाटन केले. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्प्लनेड-हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटनमेट्रोची वैशिष्ट्येमेट्रोच्या मार्गाची लांबी १६.६ किमी आहे. त्यातील १०.८ किमीचा मार्ग भुयारी आहे.देशात एखाद्या नदीखाली सर्वांत खोल बांधलेला बोगदा अशी या बोगद्याची ओळख आहे.या मेट्रोच्या मार्गातील ४.८ किमीचा एक मार्ग हावडा व सॉल्टलेकला जोडतो.हुगळी नदीच्या पाण्याखालून जाणाऱ्या या भुयारी मेट्रो मार्गात सहास्थानके आहेत. त्यातील चार स्थानके ही भुयारी आहेत.हुगळी नदीच्या पात्राचा ५२० मीटर लांबीचा भाग ही मेट्रो केवळ ४५ सेकंदांमध्ये पार करते.ही मेट्रो चालविण्यासाठी ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन (एटीओ) या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जातो.

४९६०कोटीखर्च किती आला? ७ ते १०लाखकिती लोकांना फायदा? एप्रिल २००९ काम कधी सुरू? २०१७ बोगदा तयार करण्यास केव्हा सुरुवात? एप्रिल २०२३ चाचणी कधी?

फायदा काय? - रस्त्यावरील गर्दी कमी होणार- वाहनांचे प्रदूषण कमी होणार- प्रवासातील वेळ वाचणार- प्रवाशांना अखंड, सोपा आणि आरामदायी प्रवास करता येणार- मेट्रोच्या तिकिटाची किंमत पहिल्या दोन किमीसाठी फक्त ५ रुपये आहे. त्यानंतर यात वाढ होत ती १०, १५,२०,२५ आणि ५० रुपयांपर्यंत आहे.

मोदींचाही प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मेट्रोतून एस्प्लनेड ते हावडा मैदानपर्यंतचा प्रवासही केला. त्यावेळी मेट्रोच्या डब्यात काही शालेय विद्यार्थीही होते. 

देशातील सर्वांत खोल मेट्रो स्टेशनहावडा मेट्रो स्टेशन जमिनीपासून ३२ मीटर खोल बांधण्यात आले आहे. इतक्या खोलवर बांधलेले हे देशातील पहिलेच मेट्रो रेल्वे स्टेशन आहे. सध्या, पाण्याखालील मेट्रो मार्ग फक्त लंडन आणि पॅरिसमध्येच आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे