शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत महिलांना मेट्रो, बस प्रवास मोफत; आपची नवी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 03:34 IST

पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेणार निर्णय

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत महिलांना मेट्रो व बस प्रवास मोफत करण्याचा आम आदमी पार्टीचा विचार असून, याद्वारे महिलांना सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. पुढील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होत असून, त्याच्या तोंडावर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

एका जाहीर सभेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्ली परिवहन महामंडळाच्या बसमध्ये व मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवास देणारी योजना आणण्यात येईल. याबाबत ३ जून रोजी घोषणा करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, दिल्लीचे वाहतूकमंत्री कैलाश गेहलोत यांनी या योजनेचा सर्व बाजूंनी विचार करण्यासाठी बैठकीच्या अनेक फेºया पूर्ण केलेल्या आहेत.

बसमध्ये मोफत प्रवास योजना लागू करणे अवघड नाही; परंतु मेट्रोमध्ये अशी योजना आणणे आव्हानात्मक काम आहे. कारण मेट्रोमध्ये दिल्ली सरकार व केंद्राचा ५०-५० टक्के वाटा आहे. आधीच मेट्रोबाबत केंद्र व राज्य सरकारमध्ये भाडेवाढ, चौथ्या टप्प्याचे काम अशा अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. त्यात पुन्हा या वादाची भर पडणार आहे. त्यामुळे तांत्रिक व आर्थिक मुद्यांवर मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवास देणे सोपे दिसत नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.

विजेचा फिक्स्ड चार्ज कमी करणारवीज बिलातील फिक्स्ड चार्ज कमी करण्यासाठी दिल्ली सरकार दिल्ली विद्युत नियामक आयोगाशी चर्चा करीत आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. मागील वर्षी आयोगाने दिल्ली सरकारशी विचारविनिमय न करताच फिक्स्ड चार्ज वाढवला होता. पुढील महिन्यात नवीन शुल्क निर्धारित करण्यात येणार आहे. हा दर पूर्वीच्या स्तरावर आणण्याचे आमचे प्रयत्न असून, आयोग यावर सहमत होण्याची शक्यता आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

टॅग्स :delhiदिल्लीAAPआप