शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : लैंगिक छळाचा आरोप झालेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर देणार मंत्रिपदाचा राजीनामा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 12:07 IST

लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अकबर यांच्यावर त्यांच्या काही पत्रकार महिला सहकाऱ्यांना लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर नायजेरियाच्या दौऱ्यावर असलेल्या अकबर यांना दौरा अर्ध्यावर  सोडून मायदेशी परतण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. एम.जे. अकबर परदेश दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर त्यांच्याकडून पदाचा राजीनामा घेण्यात येऊ शकतो. अकबर यांच्यावर झालेले आरोप केंद्र सरकारने गांभीर्याने घेतले आहेत. त्यामुळे वैयक्तिक कारणांचा हवाला देऊन अकबर हे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. मात्र ते भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. देशात सुरू झालेल्या #MeToo मोहिमेंतर्गत अनेक महिला समोर येऊन आपल्या झालेल्या शोषणाला वाचा फोडत आहेत. लैंगिक छळाचा आरोप झालेल्यांपैकी बहुतेक जण मनोरंजन, चित्रपट व प्रसारमाध्यमांतील असून, अकबर हे असा आरोप झालेले पहिलेच राजकीय नेते आहेत.  परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी ते वृत्तपत्राचे संपादक असताना आमचा लैंगिक छळ केला होता, असा आरोप किमान सहा महिला पत्रकारांनी केला होता. इंडिया टुडे, द इंडियन एक्स्प्रेस, मिंटच्या प्रिया रामाणी या माजी पत्रकार असून, त्यांनी पहिल्यांदा अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. ‘व्होग इंडिया’ला गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये लिहिलेल्या लेखात रामाणी यांनी अकबर यांच्याबरोबर आलेला अनुभव सांगितला आहे. त्या लिहितात, तेव्हा संपादक असलेल्या अकबर यांनी मला दक्षिण मुंबईतील त्यांच्या हॉटेलच्या खोलीत नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले.मी तेव्हा २३, तर अकबर ४३ वर्षांचे होते. या हॉटेलमध्ये ते नेहमीच मुक्कामाला असायचे. रामाणी यांनी म्हटले की, ती मुलाखत कमी आणि डेट जास्त होती व तीत त्यांनी मला ड्रिंक देऊन जुनी हिंदी गीते गायली. मला अकबर यांनी त्यांच्या बेडवरही बसायला सांगितले. बेडवर बसायला फारच छोटी जागा असल्याचे सांगून रामाणी यांनी त्याला नकार दिला होता.दरम्यान, अकबर यांच्याबाबत कोणताही निर्णय घेताना संपूर्ण विचार केला जाईल. आम्ही अविचाराने कोणताही निर्णय घेणार नाही, मात्र हे प्रकरण महिला सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे सरकारशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले आहे.  

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरCentral Governmentकेंद्र सरकारMetoo Campaignमीटू