शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo: केंद्रीय मंत्र्यानं एका 'रात्री'साठी विचारलं होतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:57 IST

ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपेंनी स्वत:ची मीटू कहाणी मांडली माध्यमांसमोर

मुंबई : प्रख्यात लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनी मीटू मोहिमेला पाठिंबा देत, स्वत:वर बेतलेला प्रसंग उघड केला आहे. लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मलाही आलेत. एका माजी केंद्रीय मंत्र्याने तर मला एका रात्रीसाठी विचारणा केली होती, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. मात्र त्याचे नाव न सांगता ते आता हयात नाहीत, एवढेच त्यांनी म्हटले आहे.त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यानिमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मी टू' मोहिमेविषयी त्या म्हणाल्या, ह्यमी लहानपणीच लैंगिक गैरवर्तनाचा किळसवाणा अनुभव घेतला. पुण्यात सायकलवरून जात असताना, एका रोडरोमिओने माझी छेड काढली होती. पोलीस स्टेशनपर्यंत त्याने पाठलाग केला. मला पोलिसांत तक्रार दाखल न करण्याचा सल्ला जवळच्यांनीच दिला.'सिनेसृष्टीतील अनेक पुरुषांनी बळजबरीने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. एकदा कार्यक्रमातून निघताना एका केंद्रीय मंत्र्याने मला घरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली. मी निघाले, तेव्हा, माझ्यासोबत एक रात्र घालवशील का? अशी विचारणा करणारी चिठ्ठी त्यांनी मला दिली. मी त्यांना स्पष्ट नकार दिला,' असेही सांगून सई परांजपे म्हणाल्या, की मी टूद्वारे अनेक महिला आवाज उठवत आहेत. या मोहिमेतून काहीतरी ठोस निष्पन्न व्हायला हवे. 

टॅग्स :Metoo Campaignमीटू