शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

#MeToo: एम. जे. अकबर यांची खासदारकी धोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 07:26 IST

अकबर यांची खासदारकी काढून घ्यावी यासाठी भाजपा नेते आक्रमक

भोपाळ: लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे वादात सापडलेले भाजपा नेते एम. जे. अकबर यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तब्बल 15 महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानं काल अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता त्यांची खासदारकीदेखील धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या नेत्यांनीच त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अकबर यांना भाजपानं मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवलं आहे. पुढील महिन्यात मध्य प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. अकबर यांच्यावरील आरोपांचा फटका या निवडणुकीत भाजपाला बसू शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील भाजपा नेत्यांनी अकबर यांची खासदारकी काढून घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यामध्ये राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. मात्र कारवाईचा धोका असल्यानं कोणीही माध्यमांसमोर बोलायला तयार नाही. अकबर यांची खासदारकी काढून घेण्यात यावी, अशी मागणी या नेत्यांकडून पक्ष नेतृत्त्वाकडे केली जाणार आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यावर अकबर यांना 2016 मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. मोदींच्या मंत्रिमंडळातील आणखी एक सदस्य धर्मेंद्र प्रधान यांनादेखील मध्य प्रदेशातून खासदारकी देण्यात आली आहे. पंधरा महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. हे आरोप सुरू असताना अकबर परदेशात होते. भारतात परतल्यावर ते मंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र भारतात परतताच त्यांनी कायदेशीर लढा देणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर त्यांनी पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावादेखील दाखल केला. रमानी यांनी अकबर यांच्यावर सर्वप्रथम लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. मात्र यानंतर 19 महिला पत्रकार रमानी यांच्या बाजूनं उभ्या राहिल्या. त्यामुळे अकबर यांच्या अडचणी वाढल्या. अखेर काल त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागलेले ते मोदी सरकारमधील पहिलेच मंत्री आहेत.  

टॅग्स :Metoo CampaignमीटूM J Akbarएम. जे. अकबरsexual harassmentलैंगिक छळ