शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo: लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात अकबर उतरवणार 97 वकिलांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 09:30 IST

अकबर यांच्याकडून महिलेविरोधात मानहानीचा दावा

नवी दिल्ली: केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. विशेष म्हणजे स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अकबर तब्बल 97 वकिलांची फौज न्यायालयात उभी करणार आहेत. अकबर यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी करांजवाला अँड कंपनी ही लॉ फॉर्म मैदानात उतरणार आहे. मात्र या 97 वकिलांपैकी केवळ 6 वकिलच प्रत्यक्ष न्यायालयात अकबर यांची बाजू मांडतील, असं करांजवाला अँड कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.एम. जे. अकबर यांच्याविरोधात सर्वप्रथम प्रिया रमानी यांनी आवाज उठवला. अकबर यांनी एका हॉटेलमध्ये बोलावून आपल्यासोबत गैरवर्तन केल्याची तक्रार रमानी यांनी केली. यानंतर आतापर्यंत तब्बल 10 महिलांनी अकबर यांनी केलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. या सर्व महिलांविरोधात कायदेशीर संघर्ष करण्याचा निर्णय अकबर यांनी केला आहे. आपल्यावरील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं अकबर यांनी म्हटलं आहे. रविवारी अकबर आफ्रिकेहून भारतात परतले. यानंतर सोमवारी त्यांच्या वकिलांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. एम. जे. अकबर संपादक पदावर असताना त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप 10 महिलांनी केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचं अकबर यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनंच हे आरोप होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अकबर यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी करांजवाला अँड कंपनीकडे आहे. 'आमच्या लॉ फर्मकडे 100 वकील आहेत. यातील 6 जण गुन्हेगारी प्रकरणात अशिलाची बाजू मांडतात. तेच वकील या प्रकरणात अकबर यांच्या वतीनं युक्तीवाद करतील,' अशी माहिती लॉ फर्मच्या प्रवक्त्यांनी दिली. 

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरMetoo Campaignमीटूsexual harassmentलैंगिक छळ