शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : एम. जे. अकबर यांचे मंत्रिपद आले धोक्यात!; सात महिला पत्रकारांनी केल्या लैंगिक छळाच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 06:07 IST

अनेक महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबरोबरच भाजपा व मोदी सरकारही अडचणीत आले आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : अनेक महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबरोबरच भाजपा व मोदी सरकारही अडचणीत आले आहे. त्यामुळे अकबर आता स्वत:हून राजीनामा देतात की त्यांना डच्चू दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आतापर्यंत सात महिला पत्रकारांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. याआधी बलात्काराच्या आरोपावरून निहालचंद मेघवाल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते.अकबर सध्या नायजेरियात असून, ते गुरुवारी रात्री वा शुक्रवारी दिल्लीत परततील. त्यांनी या तक्रारींविषयी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपातून दबाव वाढत आहे. याआधी मनेका गांधी यांनी या तक्रारींची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीही तीच मागणी केली. अर्थात अकबर यांनीच त्यावर बोलणे उचित ठरेल, असे त्या म्हणाल्या. महिलांना अशा विषयांवर बोलणेच अवघड असते. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, नियमित पगारासाठी आणि सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्या नोकरी करतात. त्यामुळे अशा महिलांना पाठिंबा व न्याय मिळणे आवश्यकच आहे, असे इराणी म्हणाल्या.निहालचंद मेघवाल यांच्यावर बलात्काराचा आरोप होताच, त्यांना डच्चू देण्यात आला होता. भाजपा नेत्यांच्या दृष्टीने एम. जे. अकबर हे तर बाहेरून पक्षात आले आहेत. मुस्लीम समाजही त्यांना आपले मानत नाही. केंद्र सरकारला पश्चिम आशियाई देशात मदत व्हावी यासाठी अकबर यांना मंत्री केले. पण त्यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाची प्रकरणे बाहेर येत असताना, त्यांचे पदच धोक्यात आले आहे.अर्थात मंत्रिपदावरून काढण्यापूर्वी अकबर यांना त्यांची बाजू मांडण्याची नक्कीच संधी दिली जाईल, असे एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले. अकबर यांच्याविरोधात ज्या पद्धतीने तक्रारी येत आहेत, ते पाहता, त्यांना सरकारमध्ये ठेवणे योग्य नाही, असे रा. स्व. संघाचेही मत असल्याचे समजते.या आहेत सात जणीएम. जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुमा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली कधी ना कधी काम केले आहे.पुरुष आपल्या पदाचा अनेकदा गैरवापर करताना आढळतात. चित्रपटसृष्टीप्रमाणे माध्यमे, राजकारण आणि कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी असे करत असतात. आता महिला उघडपणे बोलू लागल्या असून, त्यांचे म्हणणे गांभीर्याने घ्यायलाच हवे.- मनेका गांधी, केंद्रीय मंत्री

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरMetoo Campaignमीटू