शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : एका संपादकाचा राजीनामा, तर दुसरा संपादक सक्तीच्या रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 01:27 IST

लैंगिक शोषणाविरुद्ध महिलांनी सुरु केलेल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे, तर अन्य क्षेत्रांतही हे प्रकार होत असल्याचे उघड झाले आहे.

नवी दिल्ली : लैंगिक शोषणाविरुद्ध महिलांनी सुरु केलेल्या ‘मी टू’ मोहिमेमुळे केवळ बॉलीवूडमध्येच नव्हे, तर अन्य क्षेत्रांतही हे प्रकार होत असल्याचे उघड झाले आहे. एका महिला पत्रकाराने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर हिंदुस्थान टाईमचे ब्युरो चीफ प्रशांत झा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर टाइम्स आॅफ इंडियाच्या हैदराबाद आवृत्तीचे संपादक के.आर. श्रीनिवास यांना कंपनीने सात दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.के. आर. श्रीनिवास यांच्यावरील आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना प्रशासकीय रजेवर पाठविले आहे, असे टाइम्स आॅफ इंडियाने म्हटले आहे. श्रीनिवास यांच्यावर किमान पाच महिला पत्रकारांनी आरोप केलेहोते.प्रशांत झा यांचाही राजीनामा हिंदुस्थान टाइम्सने स्वीकारला असून, ती जबाबदारी अन्य संपादकाकडे सोपविली आहे. मात्र, परराष्ट्र राज्यमंत्री व माजी ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर यांनी स्वत:वरील आरोपांना अद्याप उत्तर दिलेलेनाही.केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी सोमवारीच ‘मी टू’ मोहिमेचे स्वागत केले होते. मात्र, त्यांच्याच पक्षाचे भाजपचे नेते व परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाबद्दल त्यांनी स्वत: व भाजपनेही बोलण्याचे टाळले आहे.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्याविषयीच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले, तर मंत्रालयानेही अकबर यांच्यावरील आरोपांबद्दल बोलण्यास नकार दिला. अकबर यांनी ‘एशियन एज’चे संपादक असताना नोकरीच्या मुलाखतीच्या निमित्ताने आपल्याला हॉटेलात बोलावून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप महिला पत्रकाराने केलाआहे.‘हिंदुस्थान टाइम्स’चे ब्युरो चीफ यांच्यावरही महिलेच्या शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर माझ्यावर झालेले आरोप पाहता, मी ब्युरो चीफ व राजकीय संपादक या पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रशांत झा यांनी म्हटले आहे. एका वकील महिलेला त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह मेसेजेस पाठवले होते, असा आरोप आहे.भाजपा खासदाराचा वेगळा सूरमनेका गांधी यांनी मी टू मोहिमेचे स्वागत केले असले तरी त्यांच्याच पक्षाचे खासदार उदित राज यांनी ही मोहीम काही मंडळींना बदनाम करण्यासाठी चालवली असल्याचा वास येतो, असे म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीविरुद्ध १० वर्षांनी आरोप करून काय उपयोग? त्याची सत्यता कशी पडताळून पाहता येणार, असे सवाल करीत, मी टू चळवळीतून एक चुकीची प्रथा सुरू होत असल्याचे खा. उदित राज यांनी म्हटले आहे.एडिटर्स गिल्ड आॅफ इंडियाने महिला पत्रकारांचा त्यांच्याच पुरुष सहकाऱ्यांकडून लैंगिक छळ झाल्याच्या आरोपांबद्दल निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्या घटनांचा उल्लेख झालेला आहे त्यांची नि:पक्षपातीपणे चौकशी संबंधित प्रसारमाध्यमाच्या संघटनेने करावी. लैंगिक छळ/बलात्काराच्या आरोपांत जो कोणी दोषी आढळेल त्याला शिक्षा केली जावी, असे आवाहन या निवेदनात केले गेले आहे.सर्वोच्च न्यायालयात सार्वजनिक हित याचिका दाखल झाली असून, माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी बलात्कार केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. या याचिकेत म्हटले आहे की, ज्या लोकांमध्ये सोली सोराबजी यांची नेहमी ऊठबस असते तेथे त्यांची ‘प्रतिमा’ ‘महिलांचे सिरियल सेक्शुअल हॅरासर’ अशी आहे, असे अनुषा सोनी यांनी टष्ट्वीट केले आहे.

टॅग्स :Metoo Campaignमीटू उपक्रम