शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo : प्रिया रमानींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा, 18 ऑक्टोबरला सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 13:48 IST

#MeToo : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. याप्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टात 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली - परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. याप्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टात 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. एम. जे. अकबर यांनी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात 15 ऑक्टोबरला अब्रुनुकसानी खटला दाखल केला होता. करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी अकबर यांनी आपली बाजू मांडली असून, त्यांनी संबंधितांवर दावाही दाखल केला आहे. याबाबत अकबर यांच्या वकिलांनी सांगितले की, अकबर यांच्या बाजूनं लढण्यास 97 वकिलांची फौज तयार आहे. 

''लैंगिक शोषणाचे सारे आरोप पूर्णत: खोटे आहेत. खोट्या आरोपांना पाय नसतात मात्र त्याचे विष हमखास बाधते. बेजबाबदार आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे'', असा इशारा देत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी या प्रकरणात अखेर आपले हात झटकले.

(#MeToo आरोपांचे तथ्य तपासल्यानंतरच एम. जे. अकबर यांच्यावर कारवाई : अमित शहा)

 

पत्रकार प्रिया रमानींनी म्हटलं, 'सामना करण्यास मी तयार'पत्रकार प्रिया रमानी यांनी सोमवार (15 ऑक्टोबर) म्हटलं की,  'सत्यच माझा बचाव करणार आहे. एम. जे. अकबर यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याविरोधात सामना करण्यास मी तयार आहे. अकबर भीती दाखवून, धमकावून आणि लैंगिक शोषण करुन पीडितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत'.

 पंतप्रधान मोदींनी मौन सोडावे- काँग्रेसअकबर यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून गप्प आहेत. त्यांचे हे मौन अस्वीकार्य आहे. सरकारचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी मौन त्वरित सोडले पाहिजे, अशी मागणी राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी केली. जे पंतप्रधान बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संकल्प जाहीर करतात, महिलांच्या प्रतिष्ठेविषयी वारंवार बोलतात, ते आज गप्प कसे? हा विषय केवळ सरकारच्या नैतिकतेशी संबंधित नाही तर पंतप्रधानांनी ज्यांना सन्मानाने उच्चपदांवर बसवले त्यांची प्रतिष्ठाही या आरोपांमुळे पणाला लागली आहे, असेही शर्मा म्हणाले.

काय आहे प्रकरण ?एम. जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुमा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली कधी ना कधी काम केले आहे. पुरुष आपल्या पदाचा अनेकदा गैरवापर करताना आढळतात. चित्रपटसृष्टीप्रमाणे माध्यमे, राजकारण आणि कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी असे करत असतात. आता महिला उघडपणे बोलू लागल्या असून, त्यांचे म्हणणे गांभीर्याने घ्यायलाच हवे, असंही केंद्रीय मंत्री मनेका गांधी म्हणाल्या आहेत. 

या आहेत सात जणी :एम.जे. अकबर यांच्याविरोधात पहिली तक्रार प्रिया रमणी यांनी केली होती. त्यानंतर गझला वहाब, साबा नकवी, शुतापा पॉल, शुभा राहा, सुपर्णा शर्मा व प्रेरणा सिंग बिंद्रा यांनीही अकबर यांच्याविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी केल्या आहेत. या सर्व महिला पत्रकारांनी अकबर यांच्या हाताखाली काम केले आहे.

टॅग्स :M J Akbarएम. जे. अकबरJournalistपत्रकारMetoo Campaignमीटू