शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

#MeToo : अकबर यांच्यावर आता अमेरिकेतील महिला पत्रकाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 16:12 IST

वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये या महिला पत्रकाराने तिच्यावर ओढवलेला गंभीर प्रसंग मांडला आहे. 

वॉशिंग्टन : डझनहून अधिक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर विरोधकांच्या दबावामुळे परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले भाजपचे नेते एम. जे. अकबर यांच्यावर आता एका महिला पत्रकारानेही थेट अमेरिकेहून आरोप केले आहेत. वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये या महिला पत्रकाराने तिच्यावर ओढवलेला गंभीर प्रसंग मांडला आहे. 

भारतीय पत्रकार पल्लवी गोगोई 23 वर्षांपूर्वी एशियन एजमध्ये काम करत होती. यावेळी त्या 22 वर्षांच्या होत्या. सध्या त्या नॅशनल पब्लिक रेडियोमध्ये काम करतात. एशियन एजमध्ये असताना पल्लवी जयपूरमध्ये एका स्टोरीवर काम करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी अकबर प्रसिद्ध संपादक होते. पल्लवीला पत्रकारितेची फारशी माहितीही नव्हती. पल्लवी या अकबर यांची पुस्तके वाचून प्रभावित झाल्या होत्या. 23 च्या वयामध्ये त्यांना संपादकीय पानाची जबाबदारी देण्यात आली. यासाठी त्यांना राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलावे लागायचे. जसवंत सिंह, अरुण शौरी आणि नलिनी सिंह यांच्यासारख्या नेत्यांना फोन करावा लागत होता. 

पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार ही घटना 1994 मधली आहे. अकबर यांच्या केबिनमध्ये पल्लवी संपादकीय पान दाखविण्यासाठी गेल्या होत्या. ते काहीतरी चांगली हेडलाईन देतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी माझे चुंबन घ्यायला लागले. मला धक्काच बसला. मी तडक ऑफिसमधून निघाले. लाज वाटत होती. माझी मैत्रिण तुषिता हिला आजही तेव्हाच माझा चेहला आठवतो. तिने विचारल्यावर तिला खरेखरे सांगितले. तेव्हा ती एकटीच होती, असेही पल्लवी यांनी लेखात म्हटले आहे. 

दुसरी घटना मुंबईत घडलीकाही महिन्यांनी मुंबईमध्ये एका मॅगझीनच्या लाँचिंगसाठी जायचे होते. तेथे अकबर यांनी ताज हॉटेलमध्ये त्यांच्या खोलीतील सजावट पाहण्यासाठी बोलावले. तेथेही त्यांनी पुन्हा चुंबन घेतले. त्यांना धक्का देऊन मी सुटका करून घेतली. पळायला लागले तेव्हा गालावर त्यांनी मारले याचे व्रणही होते. संध्याकाळी एका मित्राने याबाबत विचारले मात्र त्याला घसरल्याने जखम झाल्याचे सांगितले. दिल्लीला आल्यानंतर अकबर यांनी पुढच्यावेळी विरोध केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. मात्र, मी ते वृत्तपत्र सोडले नाही. 

 

जयपूरमध्ये बलात्कारावेळी कपडेच फाडले....मुंबईच्या घटनेनंतर मला एका आडवळणाच्या गावात कामासाठी पाठविण्यात आले होते. यामुळे सकाऴी लवकर ऑफिसमध्ये जाऊन संपादकीय पानाचे काम संपवून पुन्हा त्या गावात रिपोर्टिंगसाठी जावे लागे. या गावात एका जोडप्याला काही लोकांनी फासावर लटकावले होते. मला देण्यात आलेले काम जयपूरमध्ये संपले होते. मात्र, अकबर यांनी सांगितले की जयपूरमध्येच ते या प्रकरणाच्या स्टोरीवर चर्चा करणार आहेत. यामुळे त्यांनी मला त्यांच्या हॉटेलच्या खोलीत बोलावले. दबावामुळे मी त्यांच्या खोलीत गेले. मात्र, त्यांनी माझे कपडे फाडले आणि बलात्कार केला. यावेळी मी त्यांना विरोधही केला. मात्र, पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे पल्लवी यांनी या लेखामध्ये म्हटले आहे. 

 

टॅग्स :Metoo CampaignमीटूM J Akbarएम. जे. अकबरreporterवार्ताहरsexual harassmentलैंगिक छळRapeबलात्कार