शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

68 वर्षांनी भेटले अन् लागल्या अश्रूंच्या धारा; भारत-पाकिस्तानमधील फाळणीच्या वेदनांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 08:01 IST

१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सकिना यांचे कुटुंब जसोवाल, लुधियाना येथे राहत होते. फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थलांतरित झाले.

अमृतसर : भारत-पाकिस्तानमधील फाळणीच्या वेदनांची आणखी एक कहाणी श्री करतारपूर साहिब गुरुद्वारामध्ये पाहायला मिळाली. पाकिस्तानातील शेखपुरा येथील ६८ वर्षीय सकिना या त्यांच्या जन्मानंतर प्रथमच श्री करतारपूर साहिब येथे त्यांचा ८० वर्षीय भाऊ गुरमेल सिंग यांना भेटल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी एकमेकांना फक्त छायाचित्रांमध्ये पाहिले होते.

१९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सकिना यांचे कुटुंब जसोवाल, लुधियाना येथे राहत होते. फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थलांतरित झाले. वडिलांचे नाव वली मोहम्मद आणि आजोबांचे नाव जामू. सकिना यांनी सांगितले की, कुटुंब पाकिस्तानात आले; पण त्यांची आई भारतातच राहिली. स्वातंत्र्याच्या वेळी बेपत्ता झालेले लोक एकमेकांना परत केले जातील, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला होता. त्यानंतर वडिलांनी पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली.

त्यांच्या आईला घेण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचे जवान जसोवाल गावात पोहोचले, तेव्हा ५ वर्षांचा भाऊ खेळायला गेला होता. आईने भावाला हाक मारली; पण तो जवळपासही नव्हता. पाक लष्कराने सांगितले की, ते आता थांबू शकत नाहीत आणि भाऊ भारतातच राहिला. सकिना यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर १९५५ मध्ये पाकिस्तानात झाला.

पहिल्यांदा भाऊ समोर दिसला...n यानंतर सकिना आणि त्यांचा भाऊ गुरमेल यांच्या कुटुंबीयांनी श्री करतारपूर साहिब येथे भेटण्याचे ठरवले. गुरमेल आपल्या बहिणीला श्री करतारपूर साहिब येथे पहिल्यांदा भेटले. n आता त्यांना आशा आहे की, दोन्ही देशांची सरकारे त्यांना व्हिसा देतील; जेणेकरून दोन्ही भाऊ-बहीण त्यांच्या आयुष्यातील काही दिवस एकमेकांसोबत घालवू शकतील.

अशी झाली भेट...सकिना म्हणाल्या की, सुरुवातीला त्यांचा भाऊ कुटुंबाला पत्र पाठवू लागला. सकिना यांना कळायला लागल्यावर वडिलांनी त्यांना एक भाऊ आहे, असे सांगून त्याचा फोटो दाखवला. सकिना यांच्या जावयाला ही गोष्ट कळताच त्यांनी त्यांच्या भावाला शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. पाकिस्तानमधील यू-ट्यूब चॅनेलने सकिनासोबत ठेवलेल्या काही पत्रांच्या मदतीने भारतातील पंजाबमध्ये शोध सुरू केला. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान