शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपपत्रासाठी पीडितेचा नुसता जबाब पुरेसा नाही, न्यायालयाने पोलिस यंत्रणेला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 06:00 IST

अजामीनपात्र गुन्ह्याच्या प्रकरणात ढिसाळ पद्धतीने करण्यात आलेल्या तपासामुळे न्यायालयाच्या सदसदविवेकाला धक्का बसला आहे, असे न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटले.

नवी दिल्ली : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी केवळ पीडितेचा जबाब पुरेसा नाही, असे स्पष्ट करत दिल्लीतील न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. 

‘कायदा असा आहे की बलात्कार पीडितेच्या साक्षीला पुष्टीकरणाची गरज नाही आणि बलात्कार पीडितेची साक्ष जर न्यायालयाने खरी मानली तर ती आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेशी आहे. मात्र, कायद्याचे हे तत्त्व न्यायालयासाठी आहे, तपास यंत्रणेसाठी नाही. तसेच याचा अर्थ असा नाही की बलात्कार पीडितेने फौजदारी दंड प्रक्रियेच्या कलम १६४ अंतर्गत नोंदवलेला जबाब आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुरेसा आहे.

जर तसे असते तर तपास यंत्रणा बलात्काराची चौकशी करण्याच्या जबाबदारीतून मुक्त झाल्या असत्या, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजय कुमार झा यांनी जामीन मंजूर करताना सांगितले. 

ढिसाळ तपासामुळे न्यायालयाला धक्का अजामीनपात्र गुन्ह्याच्या प्रकरणात ढिसाळ पद्धतीने करण्यात आलेल्या तपासामुळे न्यायालयाच्या सदसदविवेकाला धक्का बसला आहे, असे न्यायालयाने जामीन मंजूर करताना म्हटले. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या सामग्रीचे शक्यता आणि अशक्यतेच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट तर्क आणि तारतम्याच्या कसोटीवर उतरायला हवी. 

टॅग्स :Courtन्यायालय