मेहता प्रशालेत पारितोषिक वितरण
By admin | Updated: March 25, 2015 21:09 IST
सोलापूर:
मेहता प्रशालेत पारितोषिक वितरण
सोलापूर: जुळे सोलापूर परिसरातील वि. मो. मेहता माध्यमिक शाळेत विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. नगरसेवक नरेंद्र काळे, शाळा समितीचे अध्यक्ष गिरीश कुमठेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. काळे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निकोप राजकारणासाठी भावी आयुष्यात राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका र्शुती बागेवाडी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित कोर्टीकर, र्शुती बागेवाडी, लीना भुताळे, भाऊसाहेब चोपडे यांनी पर्शिम घेतले. (प्रतिनिधी)