शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 22:16 IST

Mehbooba Mufti : जम्मू-काश्मीरमधील पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी इस्त्रायली हल्ल्यात लेबनॉन आणि गाझामध्ये ठार करण्यात आलेल्या लोकांना आणि विशेषत:  हसन नसराल्लाह याला शहीद म्हटले आहे.

Mehbooba Mufti : इस्रायली लष्कराने काल लेबनॉनमधील बेरूतमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख सय्यद हसन नसराल्लाह याचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यांनंतर लेबनॉनमधील लाखो लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी इस्त्रायली हल्ल्यात लेबनॉन आणि गाझामध्ये ठार करण्यात आलेल्या लोकांना आणि विशेषत:  हसन नसराल्लाह याला शहीद म्हटले आहे.

सध्या जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहे. अशा परिस्थित हसन नसराल्लाह याच्या मृत्यूनंतर मेहबूबा मुफ्ती उद्या आपल्या सर्व निवडणूक प्रचार सभा रद्द केल्याची घोषणा केली आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, लेबनॉन आणि गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांसोबत, विशेषत:  हसन नसराल्लाह याच्या मृत्यूबद्दल एकजुटता दर्शविण्यासाठी मी उद्या (रविवार) माझा निवडणूक प्रचार सभा रद्द करत आहे. आम्ही या दु:खाच्या आणि प्रतिकाराच्या काळात पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या लोकांच्या पाठिशी आहोत.

ओआयसीनं बोलावली बैठक दरम्यान, इराणने लेबनॉन आणि पॅलेस्टाईनमधील इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) च्या सदस्य देशांच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. शुक्रवारी ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना, इराणचे उप परराष्ट्र मंत्री (कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी) काझेम घरिबादी यांनी पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी इस्लामिक देशांमधील ऐक्य आणि एकता या विषयावर जोर दिला.

कोण होता हसन नसरल्लाह?सय्यद हसन नसरल्लाहचा जन्म ३१ ऑगस्ट १९६० रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतच्या उत्तरेकडील बुर्ज हमौद येथे झाला होता. १९९२ मध्ये हसन नसराल्लाहला हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनवण्यात आले. इराणच्या पाठिंब्याने हसन नसराल्लाहने लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटना अतिशय मजबूत आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली होती. दरम्यान, हिजबुल्लाहचे इस्रायलशी असलेले शत्रुत्व नवीन नाही, उलट हिजबुल्लाहची स्थापनाच इस्रायलविरोधात होती. हसन नसराल्लाह हा १९७५ मध्ये लेबनॉनमधील गृहयुद्धात सक्रिय झाला होता. तो इस्रायलच्या लेबनीज भूभागाच्या विरोधात होता. तेव्हापासून त्याचे इस्रायलशी जास्त वैर निर्माण झाले होते. हसन नसराल्लाह पूर्वी शिया मिलिशिया संघटनेचा सदस्य होता. नंतर हिजबुल्लाहमध्ये सामील झाला. १९९२ मध्ये हिजबुल्ला प्रमुख सय्यद अब्बास मुसावीची हत्या झाली. त्यानंतर हसन नसराल्लाह हा हिजबुल्लाहचा प्रमुख नेता बनला.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरInternationalआंतरराष्ट्रीय