शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनला गेलेलं कपल अजूनही बेपत्ता; ड्रोनच्या मदतीने घेतला जातोय शोध; काय आहे हे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 11:41 IST

सोहरा भागात अचानक बेपत्ता झालेल्या इंदूर येथील नवविवाहित कपलचा शोध घेण्यासाठी  ड्रोन आणि स्निफर डॉग तैनात केले आहेत.

मेघालय पोलिसांनी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा भागात अचानक बेपत्ता झालेल्या इंदूर येथील नवविवाहित कपलचा शोध घेण्यासाठी  ड्रोन आणि स्निफर डॉग तैनात केले आहेत. मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी मंगळवारी रात्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

मेघालय गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता कपलचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि विशेष के9 डॉग स्क्वॉड तैनात करण्यात आले आहेत. कपल ज्या लिव्हिंग रूट ब्रिजवर एक रात्र राहिले होते, तिथे शोध घेण्यासाठी तीन शोध पथकांना मदत करण्यासाठी ड्रोन आणि के9 युनिट्स तैनात करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम २२ मे रोजी मावलाखियात गावात पोहोचले आणि सोहरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नोंगरियात गावातील लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी स्कूटर भाड्याने घेतली. या कपलने एका होमस्टेमध्ये एक रात्र घालवली आणि दुसऱ्या दिवशी मावलाखियात परतण्यासाठी चेक-आऊट केलं.

२४ मे रोजी शिलाँग-सोहरा रस्त्यावरील एका कॅफेजवळ त्यांची स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली, त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली असं मेघालय पोलीस अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं. आतापर्यंत कपलबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही आणि त्यांचा फोन देखील बंद आहे असं शोध आणि बचाव मोहिमेत सहभागी असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

"संगमा यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून बेपत्ता कपलला शोधण्यासाठी मेघालय पोलीस आणि सर्व संबंधित पक्षांकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले" अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत नोंगरियात, मावसाहेव आणि वैसाडोंग भागात तीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. शिलाँग-सोहरा रस्त्यावरील खोऱ्यांमध्ये शोध मोहीम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नPoliceपोलिस