शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

रेल्वेची मेगाभरती! एक लाख नोकऱ्या देणार; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 07:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या जागा भरल्या जात असल्या तरी निवडप्रक्रिया पूर्ण होऊन पात्र उमेदवारांना नोकऱ्या मिळेपर्यंत दिवाळी उरकून गेलेली असेल.

नवी दिल्ली : रेल्वेमधील ‘ग्रुप डी, लेव्हल १’ मधील १,०३,७६९ पदे भरण्याची प्रक्रिया रेल्वे ‘रिक्रुटमेंट बोर्डा’ने (आरआरबी) मंगळवारी सरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या जागा भरल्या जात असल्या तरी निवडप्रक्रिया पूर्ण होऊन पात्र उमेदवारांना नोकऱ्या मिळेपर्यंत दिवाळी उरकून गेलेली असेल.विविध भागांत १८ प्रादेशिक रेल्वे रिक्रुटमेंट सेल असून उमेदवाराने आपल्या भागातील ‘आरआरसी’कडे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याची वेबसाइट मंगळवार खुली झाली. अर्ज २६ एप्रिलपर्यंत करता येतील. ट्रॅक मेन्टेनर ग्रेड ४, विद्युत, यांत्रिकी व सिन्गल आणि दळणवळण या विभागांत सहाय्यक, सहाय्यक पॉईन्ट्समन वगैरे प्रकारची ही पदे आहेत. या पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३१ वर्षे असून, दहावी उत्तीर्ण तसेच ‘आयटीआय’ उत्तीर्ण वा अ‍ॅप्रेंटिसशिप यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अशी शैक्षणिक अर्हता आहे. सातव्या वेतन आयोगानुसार या पदांचा पगार दरमहा १८ हजार रुपये आहे.महत्त्वाच्या तारखा१२ मार्च : अर्ज भरण्याची सुरुवात१२ एप्रिल : अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस१८ एप्रिल : पोस्ट व स्टेट बँकेतून शुल्क भरण्याचा शेवटचा दिवस२३ एप्रिल : अर्जाचे शुल्क ऑनलाइन भरण्याचा शेवटचा दिवस२६ एप्रिल : शुल्कासह परिपूर्ण अर्ज दाखल करण्याची मुदतसप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ : संगणकावर लेखी परीक्षेचा कालावधी

टॅग्स :railwayरेल्वेjobनोकरी