मजूर संघाच्या निवडणुकीसाठी बैठकांचा घोळ
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
चार चार संचालकांची गुफ्तगू, सहलीची चर्चा
मजूर संघाच्या निवडणुकीसाठी बैठकांचा घोळ
चार चार संचालकांची गुफ्तगू, सहलीची चर्चानाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवडणूक येत्या १० ऑगस्टला होणार असून त्यानिमित्ताने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. काल (दि.३) यासंदर्भात काही संचालकांची अनौपचारिक बैठक झाली. तसेच उद्या (दि.४) पुन्हा एका अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे वृत्त आहे.दरम्यान, काही संचालकांनी बुधवारी मजूर संघाच्या संचालकांची सहल काढण्याचेही नियोजन केले असून, त्यादृष्टीने मंगळवारी होणार्या बैठकीत चर्चा होणार आहे. काल यासंदर्भात मजूर संघाचे संचालक असलेल्या एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकारी कक्षात याबाबतची अनौपचारिक बोलणी झाल्याचे कळते. मंगळवारी (दि.४) दुपारी मजूर संघाचे नेतृत्व करणार्या चार ज्येष्ठ संचालकांची याच विषयावर अनौपचारिक बैठक मजूर संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली असून, या बैठकीस जिल्हा परिषद सभापती केदा अहेर, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक राजेंद्र भोसले, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे या चौघांची अनौपचारिक बैठक होणार असल्याचे कळते. याच बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा दावेदार निश्चित करण्याबरोबरच संचालकांच्या सहलीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे कळते. येत्या १० ऑगस्ट रोजी मजूर संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.(प्रतिनिधी)इन्फो..निवडणुकीचा कार्यक्रमअसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम- सायंकाळी पाच ते सव्वापाच मागील इतिवृत्त कायम करणे व उपस्थितांच्या स्वाक्षर्या, सव्वापाच ते साडेपाच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज नामनिर्देशन पत्रे वाटप, साडेपाच ते पावणे सहा वाजता उमेदवारी अर्ज छाननी, पावणे सहा ते सहा उमेदवारी अर्ज माघारी, सहा ते सव्वासहा वाजता आवश्यकता भासल्यास मतदान व लगेचच मतमोजणी.