्रपोलिसांच्या फेरनियोजनासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांसोबत बैठका
By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST
बदल : आयुक्तांना सादर केला जाणार अहवाल
्रपोलिसांच्या फेरनियोजनासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांसोबत बैठका
बदल : आयुक्तांना सादर केला जाणार अहवालनाशिक : पहिल्या शाही पर्वणीत पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे नागरिक व भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला़ याबाबत माध्यमांनी पोलिसांवर टीकेची झोड उठविल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली़ त्यामध्ये पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन व ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना सूचना केल्या होत्या़ त्यानुसार विविध पोलीस ठाण्यांत लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या बैठका सुरू आहेत़सिंहस्थातील दुसरी पर्वणी १३ सप्टेंबरला असून त्यामध्ये पोलीस बंदोबस्ताचे फेरनियोजन करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून केली जाते आहे़ तसेच पोलीस महासंचालकांनीही याबाबत सूचना दिल्या आहेत़ त्यानुसार बुधवारी सायंकाळी भद्रकाली, पंचवटी, साधुग्राम येथील पोलीस ठाण्यांमध्ये लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या बैठका घेण्यात येऊन त्यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या असता नागरिकांनी तक्रारींचा पाढाच अधिकार्यांसमोर मांडला़पोलीस आयुक्तांनी अधिकार्यांना दिलेल्या आदेशाप्रमाणेच सामान्य नागरिक, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, बॅरिकेडिंग या विषयावर चर्चा करून त्याचा अहवाल मागविला आहे़ यामध्ये प्रामुख्याने बॅरिकेडिंग कुठे कमी करता येईल, शहर बससेवा कुठे सुरू ठेवता येईल, कोणत्या परिसरातील दुकाने पर्वणीच्या दिवशी उघडी ठेवावीत जेणेकरून भाविकांची सोय होईल याबाबत सूचना मागविल्या जात आहेत़पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ एक व परिमंडळ दोनमधील एकूण अकरा पोलीस ठाणी, साधुग्राम याठिकाणी या बैठका घेतल्या जात असून या बैठकांमध्ये नागरिकांनी केलेल्या सूचना अहवालाद्वारे पोलीस आयुक्तांकडे पाठविल्या जाणार आहेत़(प्रतिनिधी)फोटो :- आर / फोटो / ०२ पोलीस बैठक १, २,३ या नावाने सेव्ह केले आहे़