शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारमध्ये बैठकांचे सत्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 06:57 IST

शेतकरी ठाम; आज दिवसभर उपवास; विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र झाले आहे. सोमवारी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर सरकारविरोधात एका दिवसाचा उपवास करणार आहेत. आंदोलनाची धग वाढत असल्याने रविवारी दुपारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घेतली. बैठकीत दीर्घ चर्चा झाली. कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्याने सरकारची कोंडी झाली आहे.गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत राज्यमंत्री सोम प्रकाशदेखील उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांची राजकीय कोंडी शेतकरी आंदोलनामुळे झाली आहे. कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी सरकारची बाजू मांडताना शेतकऱ्यांनी चर्चेची तयारी दाखवायला हवी, असे म्हटले आहे. गेल्या साठ वर्षांत विरोधकांनी केवळ राजकारण केले. आताही शेतकऱ्यांच्या वापर करून राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी चर्चेसाठी दोन पावले पुढे सरकले तर सरकारदेखील पुढे येईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.विरोधकांनी सरकारविरोधात सूर तीव्र केला आहे. आम आदमी पक्षानेदेखील शेतकऱ्यांच्या एकदिवसीय उपवासात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. आम आदमी पक्षाचे सर्व नेते, आमदार, कार्यकर्ते कृषी कायद्यांविरोधात उपवास करून शेतकऱ्यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणा कामगारमंत्री गोपाल राय यांनी केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील उपवास करणार आहेत. पंजाबमधून या कायद्यास सर्वाधिक विरोध होत आहे. पंजाबच्या तुरुंगमहासंचालकांनी देखील निवृत्तीची घोषणा केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीदेखील जंतर-मंतरवर शेतकरी आंदोलनात हजेरी लावली.आयआरसीटीसीची सोशल मीडियावर चर्चाआयआरसीटीसीच्या एका पुस्तिकेवरूनही सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. ४७ पानांच्या या पुस्तिकेत सरकार व शीख समुदायाच्या सकारात्मक संबंधांवर माहिती आहे. सिंह अडनाव असलेले व पंजांबी नागरिकांनाच ही पुस्तिका पाठवली जात आहे. त्यावर सरकारने स्पष्टीकरण देताना, ही पुस्तिका आधीच प्रसिद्ध झाल्याचे सांगितले.आंदोलनात काही राष्ट्रविरोधी व्यक्ती असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी व सोशल मीडियावरून करण्यात येत आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया देताना भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत म्हणाले, तसे असेल तर सरकारने त्यांना शोधावे. सरकारने गुप्तहेर यंत्रणेचा वापर करावा. आम्हाला मात्र असे राष्ट्रविरोधी कुणी आढळले नाही.सिंघू सीमेवर दर मिनिटाला येतात शेतकरीसिंघू सीमेवर दर मिनिटाला नव-नवे ट्रक आणि ट्रॉली येत आहेत. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांतून वेगवेगळ्या मार्गांनी शेकडो वाहने दिल्लीत येत असून त्यांना सीमेवर कोणीही अडवत नाही. पहाटे सहा वाजता २० शेतकऱ्यांना ताजपूर येथून घेऊन ट्रॉली आली. ट्रॉली साडेनऊ वाजता लुधियानाला परत गेली. रात्रभर ते पावसात प्रवास करत होते.शेतकऱ्यांपैकी अमनदीप सिंग (वय २५) म्हणाला की, काही शेतकरी शेतात काम करण्यासाठी त्यांच्या गावात गेले. मग आम्ही आमच्या गावचे प्रतिनिधित्व सामूहिकरित्या करण्याचे ठरविले. आम्ही जर परत गेलो तर आमची जागा इतर ट्रक्समधून आलेले लोक घेतील. ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे असे अनेक लोक आहेत.