शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हरलेल्या १६० जागांवर दिग्गज नेत्यांच्या सभा; भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 08:04 IST

राम मंदिर सोहळा, लोकसभा निवडणूक एकाच वेळी तयारी...

संजय शर्मा -नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष सध्या पूर्णपणे निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. अयोध्येतील राममंदिर आणि लोकसभा निवडणुका या दोन्हींची तयारी पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत हरलेल्या १६० जागांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ‘अब की बार... ४०० पार’, ‘तीसरी बार... मोदी सरकार’ अशा निवडणुकीच्या घोषणा देत पक्षाने संपूर्ण पक्षसंघटनेला निवडणुकीच्या तयारीला लावले आहे. अयोध्येतील राममंदिराचा कार्यक्रम आणि लोकसभा निवडणुका या दोन्हींसाठी भाजपने एकाच वेळी तयारी केली आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत राममंदिराचा फायदा मिळण्याची शक्यता आहे; त्यामुळे अयोध्येच्या राममंदिराच्या माध्यमातूनच निवडणूक जिंकण्याचा मार्ग शोधण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

अशी आहे तयारी...पक्षाचे चार प्रमुख नेते गेल्या निवडणुकीत गमावलेल्या १६० जागांवर निवडणूक रॅलींचा मॅरेथॉन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर या १६० जागांवर या चार नेत्यांच्या मॅरेथॉन निवडणूक सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या तीन ते चार जागांचे गट करण्यात आले असून प्रत्येक गटात या चार नेत्यांपैकी एकाची निवडणूक रॅली होणार आहे. 

विजयाचा मार्गही अयोध्येतूनच...२५ जानेवारी ते २५ मार्च या काळात देशातील भाविकांना अयोध्या येथील राममंदिरात नेण्याची तयारी आणि लोकसभा निवडणुकीची तयारी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत दोन्हींच्या एकत्रित तयारीचा भाजपला फायदा होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. तर लोकसभा निवडणुकीत विजयाचा मार्गही अयोध्येतूनच जाईल, असा विश्वास पक्षाला आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी