शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, मोदींचा सन्मान तर अडवाणींचा ऑनलाईन सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 13:05 IST

जेपी नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून मोदी सरकार 2 मधील ही पहिलीच बैठक आहे

ठळक मुद्देराष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करण्यात आला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार केला.

नवी दिल्ली - आगामी विधानसभा निवडणूक आणि नुकतेच झालेल्या पोटनिवडणुकां समीक्षा करण्यासाठी भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. राजधानी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे. मात्र, या बैठकीला ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी हे व्हर्च्युअली उपस्थित राहिले आहेत. पुढील वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरु केली आहे. त्यानिमित्तच दिल्लीत ही बैठक होत आहे. या बैठकीला देशभरातून 124 पदाधिकारी उपस्थित आहेत. 

जेपी नड्डा आणि पंतप्रधान मोदी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. तब्बल दोन वर्षांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून मोदी सरकार 2 मधील ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे, या बैठकीत राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे दिसून येते. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत. तर राज्यस्तरावरील भाजप नेते या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेले नाही.  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करण्यात आला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार केला. या सत्कार सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ऑनलाईन हजेरी लावली. या बैठकीत गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी