शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

OMG! माणूस आहे, की चालतं फिरतं सोन्याचं दुकान? कोण आहे दीड कोटी रुपयांची ज्वेलरी घालणारा हा 'गोल्ड मॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 11:13 IST

खरे तर प्रेमसिंह यांचा सोन्याचे दागिने घालण्याचा हा छंद फार जुना आहे. प्रेमसिंह लहानपणापासूनच दागिने घालतात.

पाटणा - जगात असे अनेक लोक आहेत, जे त्यांच्या आगळ्या-वेगळ्या छंदामुळे ओळखले जातात. खरे तर, प्रत्येकालाच कोणता ना कोणता छंद अथवा आवड असते. यामुळे संबंधित व्यक्तीचे राहणीमानही इतरांपेक्षा काहीसे वेगळे असते. आम्ही आपल्याला ओळख करून देणार आहोत अशाच एका व्यक्तीची. हा व्यक्ती बिहारचा गोल्ड मॅन म्हणून ओळखला जातो. या गोल्ड मॅनचे नाव आहे प्रेम सिंह. प्रेम सिंह हे व्यवसायाने कंत्राटदार आहेत आणि ते आपल्या उत्पन्नाच्या एका भागातून सोन्याचे दागिने खरेदी करतात.

खरे तर प्रेम सिंह यांचा सोन्याचे दागिने घालण्याचा हा छंद फार जुना आहे. प्रेम सिंह लहानपणापासूनच दागिने घालतात. आता त्यांच्या अंगावर जवळपास दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने असतात. यांत सोन्याच्या साखळीपासून ते ब्रेसलेटपर्यंत सर्व प्रकारच्या दागिन्यांचा समावेश आहे.

इतर राज्यातील लोक, विशेष करून दक्षिण भारतातील लोक गोल्ड मॅन म्हणून ओळखले जातात हे समजल्यानंतर आपणही बिहारचा गोल्ड मन म्हणून का ओळखले जाऊ नये, असा विचार प्रेम सिंह यांच्या मनात आला. मग काय, त्यांनी एक-एक दागिना विकत घेण्यास सुरुवात केली. आता प्रेम सिंह जेव्हा रस्त्यावरून चालतात तेव्हा, ते एक ज्वेलरी शॉप असल्यासारखे दिसतात.  आज बाजारात दीड किलो दागिन्यांची किंमत दीड कोटी रुपये एवढी आहे. प्रेमसिंग यांना स्वतःला बिहारी गोल्डमॅन म्हणवून घेण्यात अभिमान वाटतो. मूळचे भोजपूर जिल्ह्यातील कल्याणपूर पंचायतीच्या वासुदेवपूर गावचे रहिवासी असलेले प्रेमसिंग, गेल्या अनेक वर्षांपासून पाटण्यात राहतात.

एवढे दागिने घालून रस्त्यावर फिरता, भीती वाटत नाही का? असे विचारले असता, प्रेम सिंह बिहार सरकारच्या सुशासनाची तारीफ करतात. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये सुशासन आहे. यामुळे भीती वाटत नाही, असा त्यांचा दावा आहे. मात्र, 2021 मध्येच प्रेम सिंह यांना रात्रीच्या वेळी घरी परतत असताना काही गुंडांनी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले होते. पण पाटणा पोलिसांनी त्वरीत कारवाई करत त्यांचे सर्व दागिने जप्त केले आणि गुन्हेगारांना अटक केली.

महाराष्ट्राचे गोल्ड मॅन -रमेश वांजळे -महाराष्ट्रातही सोन्याच्या दागिन्यांचा छंद असलेली अनेक नावे आहेत, होती. अनेकांना गोल्ड मॅनही म्हटले जाते. पण महाराष्ट्रातील गोल्ड मॅन म्हटल्यानंतर दिवंगत आमदार रमेश वांजळे (Ramesh Wanjle) यांचे नाव लगेच समोर येते. वांजळे  हे, मनसेच्या पहिल्याच विधानसभा निवडणूकीत निवडून आलेल्या 13 आमदारांपैकी एक होते. त्यांना गोल्डन मॅनही म्हटले जात होते. त्यांच्या अंगावर भरपूर सोने असायचे. 

सनी वाघचौरे -असेच एक नाव आहे सनी वाघचौरे. सनी आपल्या अंगावर मोठ्या प्रमाणावर सोने घालतात. यांच्याकडे गोल्ड फोन फोन आणि सोन्याचा बूट आहे. एवढेच नाही, तर सनीकडे असलेली ऑडी कारही गोल्ड प्लेटेड आहे.

दत्ता फुगे -महाराष्ट्रात गोल्ड मॅन दत्ता फुगे हे नावही प्रसिद्ध होते. ते  सोन्याचा शर्ट परिधान करत असल्याने चर्चेत आले होते. फुगे यांची 15 जुलै 2016 रोजी हत्या झाली होती.

टॅग्स :BiharबिहारGoldसोनं