शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

माध्यमउद्योजक राघव बहल यांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 1:46 AM

मीडिया क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून राघव बहल यांच्या नॉयडातील घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. ही कारवाई विशिष्ट हेतूने केली जात असल्याबद्दल एडिटर्स गिल्डने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : मीडिया क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून राघव बहल यांच्या नॉयडातील घरावर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छापे टाकले. ही कारवाई विशिष्ट हेतूने केली जात असल्याबद्दल एडिटर्स गिल्डने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.राघव बहल हे नेटवर्क १८ समूह व ‘क्विंट’ या वृत्त संकेतस्थळाचे संस्थापक आहेत. बहल यांनी विविध लाभार्थ्यांकडून बनावट स्वरूपात दीर्घकालीन भांडवली नफा मिळवला, असा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. त्यासंबंधी कागदपत्रांच्या तपासणीसाठी सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. बहल यांच्याखेरीज जे. लालवानी, अभिमन्यू व अनुप जैन या अन्य तिघांच्या घरांवरही छापा घातला. हे तिघेही या प्रकरणातील लाभार्थी असल्याचा संशय आहे.छाप्यावेळी बहल हे मुंबईत होते. घरात फक्त आई व पत्नी असून प्राप्तिकर अधिकारी त्यांना कोणाशीही संपर्क साधू देत नाहीत. मी स्वत: दिल्लीला निघालो आहे, असे बहल यांनी सांगितले. या छाप्यात अधिकाऱ्यांनी कुठलाही मेल वा दस्तावेजांची पाहणी करू नये किंवा ते ताब्यात घेऊ नयेत. या दस्तावेजांमध्ये पत्रकारितेशी संबंधित गंभीर व संवेदनशील माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकाºयांनी यापासून स्वत:ला दूर ठेवावे. याबाबत विभागाने योग्य सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे, असे बहल म्हणाले.प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील घालायाबाबत एडिटर्स गिल्डने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारला कायद्याच्या अधीन राहून चौकशीचा अधिकार आहे. पण त्या अधिकारांचा वापर सरकारवर टीका करणाºयांना धमकाविण्यासाठी अशा प्रकारे करू नये. बहल यांच्यावरील कारवाईतून हेच दिसते. ही कारवाई विशिष्ट हेतूने प्रेरित असून हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावरील घाला आहे, असे गिल्डने म्हटले आहे.

टॅग्स :raidधाड