शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांसह 5 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 21:00 IST

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना धार पोलिसांनी अटक केली

इंदोर, दि. 7 - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना धार पोलिसांनी अटक केली. मेधा पाटकरांसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सरदार सरोवर प्रकल्पामुळे ज्या ४० हजार कुटुंबांची घरे आणि जमिनी पाण्याखाली जाऊ शकतात, त्यांच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मेधा पाटकरांसह अन्य 12 जण चिकलदा येथे आठ दिवसांपासून उपोषण करीत आहेत.चिकलदामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले असून, त्यांनी आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला आहे. त्यानंतर पोलिसांनी मेधा पाटकरांसह 5 जणांना अटक केली. मध्य प्रदेश सरकारनं माझ्यासोबत 11 जणांना अटक केली आहे. आम्ही गेल्या 12 दिवसांपासून अहिंसात्मक उपोषण करतोय. मोदी सरकार आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारनं ही कारवाई केलीय, आमच्याही काहीही वार्ता न करता ही अटक केली आहे. अशा प्रकारे बळाचा वापर करून महात्मा गांधींच्या अहिंसेच्या स्वप्नाची मध्य प्रदेश सरकारनं हत्या केली आहे, असा आरोप मेधा पाटकरांनी केला आहे. तर मेधा पाटकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती डी. राजा यांनी केली होती.भाकपाचे राष्ट्रीय सचिव डी. राजा म्हणाले की, या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हा मुद्दा आम्ही संसदेत उपस्थित करणार आहोत. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील आंदोलकांना बळजबरीने हटविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू नये, अशी मागणीही त्यांनी केली होती.उपोषणामुळे मेधा पाटकर यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगून ते म्हणाले की, पाटकर यांनी उपोषण मागे घ्यावे. या आव्हानात्मक परिस्थितीत आम्हाला त्यांची गरज आहे. प्रख्यात अमेरिकी इतिहासकार नोम चोमस्की हे अलीकडेच या प्रकल्पामुळे प्रभावित लोकांच्या समर्थनार्थ पुढे आले होते. त्यांनी एका ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षरी केली होती. या प्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली होती.केजरीवाल यांचे विस्थापितांना समर्थननर्मदा सरोवरामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मध्य प्रदेश सरकारने पुढे यावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केले होते. मेधा पाटकर यांच्या बिघडत्या आरोग्याबाबतही त्यांनी काळजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील भाजपा सरकारने मेधा पाटकर यांच्याशी संपर्कही साधलेला नाही. सरोवराचे दरवाजे बंद करण्यापूर्वी सरकारने विस्थापितांशी चर्चा करायला हवी. या प्रकल्पामुळे बडवानी, धार, अलीराजपूर आणि खरगोन जिल्ह्यांतील हजारो लोकांना आपली घर सोडावी लागणार होते.