शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी! मेकॅनिकच्या मुलाने कुटुंबाचं नाव केलं मोठं; नाकारली 6 लाखांची ऑफर अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 17:10 IST

एसी मेकॅनिकचा मुलगा रजीनची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे

ध्येय निश्चित असेल तर ते गाठता येतं. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. रजीन मन्सूरी याने देखील मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे. एसी मेकॅनिकचा मुलगा रजीनची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. रजीनने कॅट परीक्षेत 99.78 टक्के गुण मिळवून टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजीन मन्सुरी याला सहा लाखांच्या नोकरीची ऑफर देण्यात आली होती मात्र त्याने ती नाकारली होती.

2021 मध्ये पहिल्यांदाच रजीन मन्सूरीने कॅट परीक्षेत 96.20 टक्के गुण मिळवले होते. याच आधारावर आयआयएम उदयपूरलाही प्रवेश मिळत होता पण रजीनने पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि कॅट परीक्षेत 99.78 टक्के गुण मिळविले. त्यामुळे आता त्याला आयआयएम कोलकाता या हार्वर्ड, स्टेनफोर्डसारख्या नामांकित संस्थेत प्रवेश घेता आला.

आयआयएम कोलकाता संस्थेची फी 27 लाख रुपये आहे. मात्र, येथे शिकणाऱ्यांसाठी कर्ज सहज उपलब्ध आहे. यासोबतच शिष्यवृत्तीची सुविधाही उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, भविष्यासाठी शिष्यवृत्ती सुरक्षित ठेवत, रजीनला शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून शिक्षण घ्यायचे आहे.

रजीनचे शालेय शिक्षण शेठ सी एन विद्यालयातून झाले आहे. शालेय शिक्षणानंतर त्याने अहमदाबाद विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. रजीनच्या वडिलांचे मासिक उत्पन्न 25 हजार रुपये आहे. यानंतरही त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी