शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

करतारपूर कॉरिडोरचं निमित्त साधून काश्मीरवर बोलणं अयोग्य, सुषमा स्वराजांचं इम्रान यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 20:44 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते करतारपूर कॉरिडोरचे पाकिस्तानच्या बाजूनं भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यावेळी इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीर विवादावर भाष्य केलं आहे. भारत पाकिस्तानमध्ये फक्त काश्मीर मुद्द्यावरून भांडण सुरू आहे. दोन्ही सरकारांनी एकत्र येऊन चर्चा केल्यास हाही प्रश्न मार्गी लागेल. जर जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही ? असे म्हणत खान यांनी भारताला मैत्रत्वाचा सल्ला दिला होता. त्यानंतर भारतानंही इम्रान खान यांच्यावर पलटवार केला आहे.इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये खऱ्या वादाचं कारण काश्मीर असल्याचं आता स्पष्टच केलं आहे. या धार्मिक कार्यक्रमात इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानंही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्ताननं पहिल्यांदा स्वतःच्या धरतीवरून होणाऱ्या दहशतवादाला आळा घालावा आणि मग इतर विषयांवर बोलावे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर होणाऱ्या दहशतवादाला पहिल्यांदा रोखलं पाहिजे. यासाठी त्यांनी कडक कारवाई केली पाहिजे. त्यानंतर इम्रान खान यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाचा भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं निषेध नोंदवला आहे. करतारपूर गुरुद्वारा कॉरिडोरच्या भूमिपूजनावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणं चुकीचं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या कार्यक्रमादरम्यान त्या मुद्द्याचा उल्लेख करणं दुर्दैवी आहे. या कॉरिडोरच्या निमित्तानं खलिस्तान समर्थक बंडखोर गोपाल सिंग चावला आणि पाकिस्तान सेनेचे प्रमुख कमर जावेद बावजा यांच्या भेटीवर आक्षेप नोंदवला आहे. भारतानं या प्रकारावर निषेध नोंदवला आहे. परंतु पाकिस्ताननं याचं समर्थन केलं आहे. शांतीसाठी केलेल्या प्रयत्नांना कोणीही विरोध करू नये, असंही पाकिस्तान सेनेचे प्रवक्ते आसिफ गफूर म्हणाले आहेत. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज