शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:31 IST

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात एमबीबीएसचा विद्यार्थी आर्यन राजपूतचा मृत्यू झाला आहे. आर्यन हा मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथील जिगसौली गावचा रहिवासी होता.

अहमदाबाद विमान अपघातात एमबीबीएसचा विद्यार्थी आर्यन राजपूतचा मृत्यू झाला आहे. आर्यन हा मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथील जिगसौली गावचा रहिवासी होता. आर्यन हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवत होता तेव्हाच एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान त्याच्या हॉस्टेलवर कोसळलं. या अपघातामुळे आर्यनच्या कुटुंबाला आणि संपूर्ण गावाला धक्का बसला आहे.

१९ वर्षीय आर्यन राजपूतने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतला होता, तो त्याच्या कठोर परिश्रमासाठी ओळखला जात होता. अपघाताच्या दिवशी दुपारी १:३९ च्या सुमारास विमान हॉस्टेलवर आदळलं तेव्हा आर्यन मेसमध्ये जेवत होता. जेवल्यानंतर त्याने त्याचा मोबाईल त्याच्या मित्राला दिला आणि म्हणाला, "तू हो पुढे, मी हात धुवून येतो." मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला. विमान अपघाताने त्या क्षणी सर्व काही उद्ध्वस्त झालं.

"अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"

अपघातानंतर लगेचच आर्यनच्या मित्राने त्याच्या मोबाईलद्वारे त्याच्या कुटुंबाला माहिती दिली की, आर्यन जखमी झाला आहे आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दुपारी २ वाजता ही बातमी मिळताच, आर्यनचे नातेवाईक अहमदाबादला रवाना झाले. पण तिथे पोहोचताच आर्यनचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. आर्यनचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आता अपूर्ण राहिलं आहे.

हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे नातेवाईक अहमदाबादमध्ये आपल्या जवळच्या व्यक्तीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले असून त्याच्या आक्रोश हेलावून टाकत आहे. विमान अपघातात एका तरुणाने आपली गर्लफ्रेंड गमावली आहे. दुःखाने व्याकुळ झालेल्या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आला होता. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAccidentअपघातAir Indiaएअर इंडिया