१८ हजार कोटींचा भूलभुलय्या...
By admin | Updated: December 25, 2015 23:58 IST
१८ हजार कोटींचा भुलभुलय्या...
१८ हजार कोटींचा भूलभुलय्या...
१८ हजार कोटींचा भुलभुलय्या...१८ हजार कोटी रुपयांच्या अनेक रस्त्यांच्या कामात भूलभुलय्या असल्याची चर्चा कार्यक्र मस्थळी होती. यादीमध्ये औरंगाबाद ते फुलंब्री मार्गे सिल्लोड ते पहूर ते जळगाव हा १५५ कि़मी.चा रस्ता १५५० कोटींचा दाखविला आहे, तर औरंगाबाद ते सिल्लोड ते अजिंठा ते पहूर मार्गे जामनेर ते मुक्ताईनगर हा ४०१ कि़मी रस्ता ४ हजार १० कोटींतून दाखविण्यात आला आहे. आता औरंगाबाद ते सिल्लोड ते अजिंठा हा एकच रस्ता असून त्याचा दोन ठिकाणी उल्लेख कशासाठी असा प्रश्न आहे. औरंगाबाद ते वैजापूर ते नाशिक १८३ कि़मी. रस्ता १८३० कोटींतून करण्यात येणार आहे. औरंगाबाद ते वैजापूर ते कोपरगाव मार्गे शिर्डी हा १५० कि़मी. रस्ता १५०० कोटींतून होईल, असे दाखविण्यात आले आहे. हे दोन रस्ते वेगवेगळ्या दिशेने दाखविण्यात आले आहेत. तसाच प्रकार औरंगाबाद ते परभणी या १२५० कोटींच्या १२५ कि़मी रस्त्याचा आहे. तोच रस्ता खामगाव ते सांगोला यामार्गे दाखविला असून ४५०० कोटींतून ४५० कि़मी.तो रस्ता करण्याचे दाखविण्यात आले आहे. या दोन्ही रस्ते वाटूर फाटामार्गे दाखविण्यात आले आहेत.