शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने दलितांकडे दुर्लक्ष केल्यामुळे 'बसपा'ची स्थापना, मायावतींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 17:49 IST

मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

लखनऊ : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. काँग्रेसच्या 'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅलीवर निशाणा साधत मायावती यांनी काँग्रेसला सत्तेत असतेवेळी जनतेचे हित का लक्षात आले नाही, असा सवाल केला. तसेच, दुसऱ्यांची चिंता करण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या स्थितीवर आत्मचिंतन केले  तर चांगले होईल, असा टोलाही मायावती यांनी लगावला. 

मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाला, "काँग्रेस आपला स्थापना दिवस 'भारत बचाओ-संविधान बचाओ' रॅलीच्या माध्यमातून साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांची चिंता व्यक्त करण्यापेक्षा काँग्रेसने स्वत: आपल्या स्थितीवर आत्म-चिंतन केले असते तर चांगले झाले असते. त्यातून बाहेर पडायला काँग्रेसला आता वेगवेगळी नाटकबाजी करावी लागत आहे."

दुसऱ्या ट्विटमध्ये मायावती म्हणाल्या, "ज्यावेळी दलित, मागास आणि मुस्लिमांना संवैधानिक हक्क मिळत नव्हता. त्यावेळी काँग्रेसला 'भारत बचाओ-संविधान बचाओ'ची आठवण का आली नाही. सत्तेत असताना काँग्रेस याकडे कानाडोळा करत होती म्हणून बहुजन समाज पार्टीची स्थापना करावी लागली. त्यामुळे आज भाजपा सत्तेत आहे."

दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर हल्लाबोल केला. तसेच, नाव न घेता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर या विरोधी पक्षांवरही  निशाणा साधला. उत्तर प्रदेशात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून इतर विरोधी पक्ष काहीच करत नाहीत. त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे आपल्यालाच सीएए आणि एनआरसीच्या विरोधात लढावे लागणार आहे. आम्ही कोणालाही घाबरणार नाही, असे सांगत प्रियंका गांधी यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीवर टीका केली.  

दिल्लीसह देशभरात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना काँग्रेसने पाठिंबा जाहिर केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यघटना वाचविण्याकरिता जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने पक्षाच्या स्थापनादिनी देशभरात मोर्चे काढायचे ठरविले. या कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी सध्या निदर्शने सुरू आहेत.

टॅग्स :mayawatiमायावतीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस