शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एक्झिट पोलनंतर मायावतींची कारवाई, जवळच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 12:09 IST

पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली रामवीर उपाध्याय यांची पार्टीच्या संपर्क प्रमुख पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

लखनऊ : एक्झिट पोलनंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावाती यांनी एक मोठी कारवाई केली आहे. पक्षाचे नेते रामवीर उपाध्याय यांना मायावतींनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली रामवीर उपाध्याय यांची पार्टीच्या संपर्क प्रमुख पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

रामवीर उपाध्याय यांचा लोकसभा निवडणुकी दरम्यान पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग होता. यासंदर्भात त्यांना सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. तरिही रामवीर उपाध्याय यांनी आग्रा, फतेहपूर सीकी, अलिगडसह अनेक जागांवरील उमेदवारांना विरोध केला आहेत. तसेच, विरोधी पार्टीच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शविला होता, असे बहुजन समाज पक्षाचे महासचिव मेवालाल गौतम यांनी सांगितले.

रामवीर उपाध्याय यांना तात्काळ पक्षातून निलंबित करण्यात आले असून विधानसभेतील बसप संपर्क नेतेपदावरुनही त्यांना हटविण्यात येत आहे. तसेच, आता पार्टीच्या कोणत्याही बैठकीत त्यांची सामील होणार नाहीत किंवा त्यांना बोलविले जाणार नाही, असेही मेवालाल गौतम यांनी सांगितले. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रामवीर उपाध्याय भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, ते स्वत: बहुजन समाज पक्ष सोडणार नव्हते. कारण, त्यांची आमदारकी धोक्यात आली असती. परंतू, आता मायावतींच्या कारवाईनंतर रामवीर उपाध्याय भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांकडून निकालांचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. यामध्ये एबीपी न्यूज आणि नेल्सनने केलेल्या सर्व्हेमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या आघाडीला 56 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, भाजपाला केवळ 22 जागा मिळतील असा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत 73 जागा जिंकणाऱ्या भाजपाला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, आजतक आणि एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार रामवीर उपाध्याय यांनी विरोध केलेल्या जागांवर भाजपाचा विजय होण्याची शक्यता वर्तविली आहे. आग्रा, फतेहपूर सीकरी, अलिगड आणि हाथसरमध्ये भाजपा येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बहुजन समाज पक्षाने रामवीर उपाध्याय यांच्यावर कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.   

टॅग्स :mayawatiमायावतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोल