शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावतींकडून कुटुंबियांना महत्त्वाची पदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 17:17 IST

राजकीय पक्षात वाढत असलेल्या घराणेशाहीला मायावती यांनी अनेकदा विरोध केला आहे.

लखनऊ - घराणेशाहीला विरोध करणाऱ्या बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याच पक्षात आता घराणेशाही सुरु असल्याचे पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये आज पार पडलेल्या बहुजन समाज पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मायावती यांनी पक्षात फेरबदल केले आहेत. मायावती यांनी भाऊ आनंद कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मायावती यांनी देशभरातील पक्षाच्या नेत्यांची आणि  पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणुकीत बसपाला १० जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. पुढील निवडणुकीत ही चांगले यश मिळावे म्हणून आतापासूनच कामाला लागा असे आदेश यावेळी मायावतींनी दिले. याचवेळी,मायावती यांनी पक्षात फेरबदल केलं. मायावती यांनी भाऊ आनंद कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.

राजकीय पक्षात वाढत असलेल्या घराणेशाहीला मायावती यांनी अनेकदा विरोध केला आहे. काँग्रेस पक्षावर याच मुद्यावरून त्यांनी अनेकदां उघडपणे टीका केली आहे. घराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावती यांनी पक्षाच्या बैठकीत भावाला राष्ट्रीय उपाध्यक्ष तर पुतण्याला राष्ट्रीय समन्वयकाची मोठी जबाबदारी दिली. त्यामुळे आता त्यांच्याच पक्षात घराणेशाही सूर झाली असल्याची राजकीय चर्चा रंगताना दिसत आहे.