शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

AIMPLB मधून हकालपट्टी करण्यात आलेले मौलवी म्हणाले, दंगली घडवण्यास इच्छुक असणाऱ्यांची साथ देणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 21:26 IST

अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद सोडवण्यासाठी तोडगा सुचवणारे  मौलाना सय्यद सलमान हुसेनी नदवी यांची  ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आपणच AIMPLB मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा केला आहे. 

नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद सोडवण्यासाठी तोडगा सुचवणारे  मौलाना सय्यद सलमान हुसेनी नदवी यांची  ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांच्याशी झालेल्या बैठकीवेळी नदवी यांनी अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील वाद सोडवण्यासाठी मौलवी नदवी यांनी तोडगा सुचवला होता. दरम्यान, आपणच AIMPLB मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा केला आहे. AIMPLB च्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नदवी म्हणाले मुस्लिम पर्सनल लॉ बौर्डाच्या पहिल्या बैठकीनंतर मी स्वत:ला या सगळ्या पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जे लढाई आणि दंगली घ़डवून आणण्यास इच्छुक आहेत, अशा लोकांची साथ द्यायची नाही, उलट जे शांती आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यास इच्छुक आहेत, अशा व्यक्तींची साथ द्यायची, असे मी ठरवले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा निवाडा चर्चेतून व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता आमची पुढील बैठक अयोध्येत होईल तेथे सर्व साधू-संतांसह या प्रस्तावावर पुढील विचार केला जाईल.  दरम्यान, अयोध्येतील बाबरी मशीद - रामजन्मभूमीच्या २.७७ एकर जमिनीच्या मालकीसंबंधीच्या अपिलांवर सुनावणी करताना धार्मिक श्रद्धा किंवा न्यायालयाबाहेर सुरू असलेला वाद या गोष्टींना थारा देणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने काल स्पष्ट केलं आहे. जमिनीच्या मालकीसंबंधीच्या नेहमीच्या दाव्यांप्रमाणेच ही सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी शुक्रवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्डाच्या सदस्यांची भेट घेतली. याआधी, अयोध्या प्रश्नी न्यायालयाबाहेरच तोडगा काढण्याची सूचना गेल्या वर्षी तत्कालीन सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी केली होती. तेव्हाही, आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला होता.  वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी सोडावी आणि मशीद बाहेर अन्य जागी उभारावी, असा प्रस्ताव रविशंकर यांनी मुस्लिम संघटनांच्या नेत्यांना दिला. तो त्यांनी मान्य केल्याचे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या वतीने सांगण्यात आलं होते. परंतु, बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक जफरयाब गिलानी यांनी श्री श्रींचा फॉर्म्युला अमान्य असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याIndiaभारत