ATS Action On Rajasthan: राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई करत सांचोर येथील मौलवी ओसामा उमर याला अटक केली आहे. हा मौलवी थेट अफगाणिस्तानमधील कुख्यात दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी जोडलेला होता. हा मौलवी देशात कट्टरता पसरवण्याच्या एका मोठ्या कटात सामील असल्याचा एटीएसचा चा दावा आहे. ओसामा उमर याच्या अटकेमुळे सीमावर्ती भागात सुरू असलेले दहशतवादी नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे.
दुबईमार्गे अफगाणिस्तानला पळून जाण्याचा कट
बाडमेर जिल्ह्यातील मुसनाराई का बास येथील मूळ रहिवासी असलेला ओसामा उमर हा सांचोरच्या इमाम नूर मोहम्मद मोहर्रम चौकात राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून आपली देशविरोधी कृत्ये करत होता. एटीएसच्या तपासणीत उघड झाले आहे की, हा मौलवी गेल्या चार वर्षांपासून इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून तहरीक-ए-तालिबानच्या टॉप कमांडर्सच्या थेट संपर्कात होता. एटीएसला त्याच्या संशयित हालचाली कळताच, त्यांनी त्याची चौकशी सुरू केली. अटक होण्यापूर्वी ओसामा उमरने देश सोडून पळून जाण्याची योजना आखली होती. तो दुबईमार्गे अफगाणिस्तानला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र एटीएसने त्याला पळून जाण्याआधीच ताब्यात घेतलं.
गेल्या शुक्रवारी एटीएसने राजस्थानमधील चार जिल्ह्यांत एकाच वेळी छापे टाकून पाच संशयितांना ताब्यात घेतले होते, ज्यात दोन सख्खे भाऊ होते. या सर्वांची जयपूर येथील एटीएस मुख्यालयात चार दिवस कसून चौकशी करण्यात आली. पुरावे आणि चौकशीनंतर, मौलवी ओसामा उमर याच्यावर गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एटीएसचे अतिरिक्त महासंचालक एम.एन. दिनेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसामा उमर ताब्यात घेतलेल्या इतर चार संशयितांना सक्रियपणे कट्टर बनवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होता.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, ओसामा हा जिहादी विचारांनी प्रेरित होता आणि तो युवकांना याच विचारांनी प्रभावित करत होता. मौलवीकडून दोन फोनही जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या इतर संशयितांची (मसूद, मोहम्मद अयूब, मोहम्मद जुनैद आणि बसीर) चौकशी सुरू असली तरी, ते भारताबाहेरील कोणत्याही दहशतवादी नेटवर्कच्या थेट संपर्कात नव्हते, असे सध्याच्या तपासातून समोर आले आहे. एटीएस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मौलवीच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहे.
Web Summary : Rajasthan ATS arrested Maulvi Osama Umar for ties to Tehrik-e-Taliban. He allegedly radicalized youth and planned escape to Afghanistan. Investigation continues into his network.
Web Summary : राजस्थान एटीएस ने मौलवी ओसामा उमर को तहरीक-ए-तालिबान से संबंधों के आरोप में गिरफ्तार किया। उस पर युवाओं को कट्टरपंथी बनाने और अफगानिस्तान भागने की योजना बनाने का आरोप है। जांच जारी है।