शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

PFI विरोधात बोलणं बंद करा नाहीतर संपवून टाकू; मौलाना रिझवी यांना मिळाली धमकी, चौकशीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 18:35 IST

देशात पीएफआयवर बंदी घातल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.

नवी दिल्ली-

देशात पीएफआयवर बंदी घातल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. त्याचबरोबर पीएफआयला विरोध करणाऱ्यांनाही सतत धमक्या मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांना पीएफआयचा निषेध केल्यामुळे फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. फोन करणाऱ्यानं आपलं नाव अब्दुल समद असल्याचं सांगितलं असून तो शाहीन बाग येथील रहिवासी असल्याचा दावा त्यानं केला आहे. फोन करणाऱ्यानं पीएफआयच्या विरोधात बोलणं बंद करा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू अशी धमकी दिली आहे. 

मौलाना शहाबुद्दीन रिझवी हे ऑल इंडिया मुस्लिम जमात दर्गाह आला हजरत बरेली शरीफचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शहाबुद्दीन रिझवी यांनी केंद्र सरकारकडे पीएफआयवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. गुरुवारी मौलानाला धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोन करून पीएफआयच्या विरोधात बोलणे बंद करा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू, अशी धमकी दिली आहे. 

मौलानानं फोन आणि व्हॉट्सअॅपवर बरेलीचे डीएम, एसएसपी यांना याची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी मौलाना यांनी एसएसपींची भेट घेऊन याबाबत तक्रार केली. शहाबुद्दीन रिझवी यांनी आपल्याला फोनवरुन जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती डीएम आणि एसएसपी यांना दिली. धमकी देणाऱ्यानं आपण दिल्लीतील शाहीन बाग येथील रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. तो त्यांना सतत धमक्या देत आहे.

मौलाना रिझवी यांनी केली सुरक्षेची मागणी"मी सातत्याने पीएफआयला विरोध करत आहे, त्यामुळे पीएफआय कट्टरतावादी संघटनेकडून या धमक्या येत आहेत. पीएफआय देशाची एकता आणि अखंडतेला धोका आहे. इस्लामची बदनामी करत आहे आणि मुस्लिमांचं नाव खराब करण्याचं काम करत आहे. आज पीएफआयमुळे संपूर्ण देशात कट्टरतावादी विचारसरणीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे मी पीएफआयला सतत विरोध करत आहे. यामुळेच मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत", असं मौलाना शहाबुद्दीन रिझवी म्हणाले.

मी धमक्यांना घाबरणारा नाही"मी पीएफआयच्या कोणत्याही धमकीच्या कॉलला घाबरत नाही. देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी, इस्लामला बदनाम होण्यापासून वाचवण्यासाठी मला जे काही बलिदान द्यावे लागेल ते देईन. पीएफआयविरोधात माझे जनआंदोलन सुरूच राहणार आहे. मी घाबरणार नाही आणि माझे सहकारी देखील घाबरणार नाहीत. प्रचार करून मी कट्टरतावाद्यांच्या विरोधात त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात प्रचार करत राहीन", असं रिझवी म्हणाले.