शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

ती बाब सुशील कुमार मोदींना पडली भारी, उपमुख्यमंत्रिपदावर सोडावे लागले पाणी

By बाळकृष्ण परब | Updated: November 15, 2020 20:26 IST

Sushil Kumar Modi News : गेली अनेक वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने काट मारली आहे.

ठळक मुद्देबिहारमधील उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहेअनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या सुशील कुमार मोदी यांची उचलबांगडी होणार असल्याचे निश्चित झाले आहेनितीश कुमार यांच्यासोबत असलेली मैत्रीच सुशील कुमार मोदी यांना भारी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे

पाटणा - बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदासाठी नितीश कुमार नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र उपमुख्यमंत्रीपदासाठी बिहार भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यात गेली अनेक वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुशील कुमार मोदी यांच्या नावावर पक्ष नेतृत्वाने काट मारली असून, आता उपमुख्यमंत्रिपदासाठी अन्य नेत्यांची नावे समोर येत आहेत. दरम्यान, सुशील कुमार मोदी यांचे उपमुख्यमंत्रिपद जाण्यामागचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे.बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील असे भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्याचवेळी राज्यातील उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या सुशील कुमार मोदी यांची उचलबांगडी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. स्वत: सुशील कुमार मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म समोरून उपमुख्यमंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे. आता नितीश कुमार यांच्यासोबत असलेली मैत्रीच सुशील कुमार मोदी यांना भारी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुशील कुमार मोदी यांनी बिहारमध्ये भाजपाला नितीश कुमार यांची मांडलिक बनवल्याचा अनेक विश्लेषकांचे म्हणणे होते.नितीश कुमार आणि सुशील कुमार मोदी यांची जोडी जगजाहीर होती. जेडीयूच्या नेत्यांपेक्षा सुशील कुमार मोदी हेच नितीश कुमार यांचा अधिक बचाव करत असत. त्यामुळेच १५ वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात नितीश कुमार आणि सुशील कुमार मोदी यांना सरकार चालवताना कधीच कुठली अडचण आली नव्हती. मात्र २०१२ मध्ये सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या एका विधानामुळे ही जोडी खटकली होती. त्यावेळी सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमार यांचा उल्लेख पीएम मटेरियल असा केला होता. मात्र त्याच वेळी बिहार भाजपामधील अन्य नेते हे नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा देत होते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपामधून नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी होत होती. गुजरात दंगलीच्या मुद्द्यावरून नितीश कुमार यांचा प्रश्न सातत्याने नरेंद्र मोदींचा विरोध करत होता. तर भाजपाचे गिरिराज सिंह यांच्यासारखे नेते मोदींना पाठिंबा देत होते. अश्विनी चौबेसुद्धा मोदींचे नाव पुढे रेटत होते. मात्र त्याचवेळी २०१२ मधील एका मुलाखतीत नीतीश कुमार पीएम मटेरियल असल्याचे म्हटले होते.मात्र सुशील कुमार मोदी यांचे हे विधान भाजपा्च्या पक्ष नेतृत्वाला आवडली नव्हती. अशा परिस्थितीत तेव्हा केलेल्या चुकीचा फटका सुशील कुमार मोदी यांना आता बसला आहे का, अशी चर्चा आता बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.दरम्यान, सुशील कुमार मोदी यांच्याबाबत केंद्रात मंत्रिमंडळामध्ये असलेले नेतेही नाराज होते. कारण सुशील कुमार मोदी हे नितीश कुमार यांच्या बचावासाठी सातत्याने पुढे येत असत. गेल्या १५ वर्षांपासून भाजपा बिहारमध्ये सत्तेत असला तरी भाजपा नितीश कुमार यांच्या छत्रछायेतून बाहेर पडत नव्हता. मा्त्र यावेळी भाजपा बिहारमध्ये मोठा पक्ष ठरला आहे, अशा परिस्थितीत भाजपाकडे सरकारमध्ये वरचष्मा राखण्याची संधी आहे.

 

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण