शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या तुरुंगातून मसूदची गुपचूप सुटका; काश्मीरमध्ये घातपाती कारवाया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 03:08 IST

भारतीय गुप्तचर संघटनांची माहिती

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर घातपाती कारवाया घडविण्यास पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला सांगितले आहे. त्यासाठी अजहर व आणखी एका प्रमुख दहशतवाद्याची तुरुंगातून गुपचूप सुटका करण्यात आली आहे. ही माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिली आहे.

यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले की, काश्मीरमध्ये येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत अनेक घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न जैश-ए-मोहम्मदकडून होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी कारबॉम्ब धडकवून केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पाकिस्ताननेमसूद अजहर (५१ वर्षे) व या संघटनेच्या आणखी काही दहशतवाद्यांना अटक केली होती. पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे हल्ले चढवून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले होते.

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिला होता. एफएटीएफच्या जूनमध्ये झालेल्या बैठकीच्या आधी पाकिस्तानने मसूद अजहरला अटक करून दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे नाटक केले होते. मसूद अजहर हा मुंबईवरील हल्ल्याच्या कटाचाही सूत्रधार आहे.

सतर्क राहण्याचा सुरक्षा दलांना आदेशकाश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने रद्द केल्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानला काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतता निर्माण करायची आहे.३७० कलम रद्द केल्याविरोधात रस्त्यावर उतरून प्रचंड हिंसाचार करण्यासाठी काश्मिरी लोकांची माथी भडकाविण्याचा पाकिस्तानचा कट आहे, असेही भारतीय गुप्तहेर यंत्रणांच्या सूत्रांनी म्हटले आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर अत्यंत सतर्क राहण्याचा आदेश सुरक्षा दलांना केंद्र सरकारने दिला आहे.

 

टॅग्स :masood azharमसूद अजहरPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी