शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसशी सहकार्यावर मार्क्सवादींमध्ये मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:46 IST

भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून हटविण्यासाठी काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत राजकीय समझोता करायचा की नाही, याविषयी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये एकमत होऊ शकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून हटविण्यासाठी काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत राजकीय समझोता करायचा की नाही, याविषयी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये एकमत होऊ शकले नाही. पक्षाच्या २२व्या राष्ट्रीय काँग्रेसपुढे आगामी तीन वर्षांच्या पक्षाच्या ध्येयधोरणांसंबंधी सादर करायचा राजकीय अहवाल या मतभेदांमुळे तयार होऊ शकला नाही.पॉलिट ब्युरोच्या दोन दिवस येथे झालेल्या बैठकीत सरचिटणीस सीताराम येचुरी व माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनी सादर केलेल्या दोन स्वतंत्र टिपणांवर चर्चा झाली. राजकीय अहवालाचा कच्चा मसुदा व त्यावर पॉलिट ब्युरोमध्ये झालेली चर्चा आता कोलकाता येथे १९ ते २१ जानेवारी या दरम्यान होणाºया केंद्रीय समितीपुढे सादर केली जाईल, असे पक्षाने एका निवेदनात नमूद केले.पक्षाच्या सूत्रांनुसार येचुरी गटाचे असे म्हणणे आहे की, निवडणुकीत पक्षाने काँग्रेसशी कोणताही उघड समझोता करू नये. मात्र, मोदी सरकार हटविण्यासाठी सर्व बिगर डाव्या पक्षांशी सहकार्याचे दरवाजे उघडे ठेवावेत. पॉलिट ब्युरोमध्ये बहुमत असलेल्या करात गटाचा या भूमिकेस विरोध आहे. त्यांच्या मते काँग्रेसशी समझोता केला नाही, तरी पक्षाने निवडणुकीत प्रादेशिक पक्षांशी समझोता करावा.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसIndiaभारत