शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा सुपुत्र सीमेवर शहीद; पाकच्या गोळीबारात परभणीच्या जवानाला वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 17:01 IST

महाष्ट्रातील परभणीत पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले आहेत.

जम्मू-काश्मीर : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीमधील एक जवान शहीद झाला असून आणखी चार जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका ऑफिसरसह तीन जवान जखमी झाले आहेत. तर महाष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून देखील चोख प्रतिउत्तर दिले जात आहे.

दरम्यान, सोमवारी दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत 13 अतिरेक्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात सक्रीय अतिरेक्यांविरुद्ध हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे. सुरक्षा दलाने केलेल्या या हल्ल्याने हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना मोठा झटका बसला आहे.अधिका-यांनी सांगितले की, शोपियांच्या काचदुरू भागात झालेल्या चकमकीत सैन्याचे तीन जवान शहीद झाले. या ठिकाणाहून अतिरेक्यांचे तीन मृतदेह मिळाले आहेत. काचदुरू येथील मोहीम संपलेली आहे. सुरक्षा दल उद्या पुन्हा येथे तपास मोहीम राबविणार आहे. पोलीस महासंचालकांनी एका वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या प्रयत्नांचाही या वेळी उल्लेख केला. दायलगाम चकमकीच्या वेळी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी एका अतिरेक्याच्या नातेवाइकांना फोन केला. ते त्यांच्याशी ३० मिनिटे बोलले. जेणेकरून, या अतिरेक्याला आत्मसमर्पण करण्यासाठी तयार केले जावे. मात्र, या अतिरेक्याने आपल्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकले नाही. या अतिरेक्याने पोलिसांच्या दिशेने फायरिंग केली. त्यानंतर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हा अतिरेकी  मारला गेला, तर अन्य एक जण जिवंत पकडला गेला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन