शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

हा तर शहिदाचा अपमान, मंत्री रॅलीवरुन येताच CRPF निरीक्षकाच्या कुटुंबानं सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 15:35 IST

रॅलीला महत्त्व देणाऱ्या नेत्यांची शहीद निरीक्षकाच्या कुटुंबाकडून कानउघाडणी

पाटणा: दहशतवाद्यांविरोधात लढताना हौतात्म्य पत्करलेल्या सीआरपीएफ निरीक्षकाच्या अंतिम दर्शनाला येण्यासाठी वेळ नसलेल्या मंत्र्यांना शहीद निरीक्षकाच्या कुटुंबानं चांगलंच सुनावलं. तुम्ही इतक्या उशिरा शहीद झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी येत आहेत. हा त्या शहिदाचा अपमान आहे, अशा शब्दांमध्ये निरीक्षकाच्या नातेवाईकांनी मंत्र्यांची कानउघाडणी केली. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना शहीद झालेल्या सीआरपीएफ निरीक्षक पिंटू कुमार सिंह यांचं पार्थिव काल सकाळी पाटण्यात आणण्यात आलं. मात्र त्यावेळी विमानतळावर राज्यातील सत्ताधारी पक्षाचा एकही नेता, मंत्री उपस्थित नव्हता. राजधानी पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्प सभा असल्यानं एनडीएचे नेते, राज्याचे मंत्री व्यस्त होते. याबद्दल शहीद निरीक्षकाच्या कुटुंबीयांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सत्ताधारी पक्षांचे नेते आणि मंत्री विमानतळावर आले होते. मात्र त्याच्या काही वेळ आधी हुतात्म्याचं पार्थिव आणलं जात असताना एकही नेता विमानतळाकडे फिरकला नाही.काल पाटण्यात पंतप्रधान मोदींची संकल्प रॅली होती. त्यामुळे बिहारच्या सत्ताधाऱ्यांनी पिंटू कुमार सिंह यांच्या कुटुंबाकडे पाठ फिरवली. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी एकही बिहार, जेडीयूचा एकही नेता उपस्थित राहिला नाही. संकल्प रॅलीनंतर बिहारचे मंत्री आणि भाजपा नेते विजय सिन्हा शहीद सीआरपीएफ निरीक्षकाच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेले. काल रात्री सिन्हा यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी शहिदाच्या कुटुंबीयांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. आमच्या सहवेदना तुमच्यासोबत आहेत. त्यामुळेच तर तुमची भेट घेण्यासाठी आलो, अशी सारवासारव भाजपाच्या मंत्र्यांनी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुटुंबानं आपला संताप व्यक्त केला. त्यावर रॅली संपल्या संपल्या तुमची भेट घेण्यासाठी आलो, असं थातूरमातूर स्पष्टीकरण देत सिन्हा यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र शहीद निरीक्षकाच्या कुटुंबानं त्यांच्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं. 'तुम्ही इतक्या उशीरा येत आहात. याला अर्थ नाही. हा शहिदाचा अपमान आहे,' अशा शब्दांमध्ये कुटुंबीयांनी त्यांचा संताप व्यक्त केला.  

टॅग्स :MartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीरBiharबिहारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी