शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day शहीद जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र; दहशतवाद्यांनी अपहरण करुन केली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 18:47 IST

सुट्टीवर असलेल्या औरंगजेब यांची घरी परतत असताना हत्या झाली होती

नवी दिल्ली: दहशतवाद्यांनी अपहरण करुन हत्या केलेले राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झालं आहे. औरंगबेज यांच्या शौर्याचा आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा शौर्य चक्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला याबद्दलची घोषणा झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये औरंगजेब यांना वीरमरण आलं होतं. याच वर्षी 15 जूनला ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या औरंगजेब यांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेला त्यांचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला होता. ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेतलेल्या औरंगजेब यांनी घरी जाण्यासाठी लष्करी तळावरुन टॅक्सी पकडली होती. ते दक्षिण काश्मीरच्या शोपियानचे रहिवासी होते. 

शोपियानला जात असलेल्या औरंगजेब यांची टॅक्सी दहशतवाद्यांनी कालम्पोरा गावाजवळ अडवली आणि त्यांचं अपहरण केलं. याची माहिती टॅक्सी चालकानं पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आणि लष्करानं संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी औरंगजेब यांचा मृतदेह कालम्पोरापासून 10 किलोमीटर अंतरावर आढळून आला. दहशतवाद्यांनी अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या केली होती. औरंगजेब जम्मू-काश्मीर लाईट इन्फंटरीच्या शादीमार्ग येथे असलेल्या 44 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय लष्करMartyrशहीदTerrorismदहशतवाद