गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाच्या मेहुण्यावर महिलेचा जीव जडला. तिने यासाठी ३ वेळा आपलं घर सोडलं. यानंतर वैतागलेल्या पतीने रडत रडत पोलिसांना फोन केला.
आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी पती पोलिसांना विनंती करत होता. पत्नीने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि आत्महत्या करण्याची धमकी देत होती. शाहिबागमध्ये ही घटना घडली आहे. पत्नीचे भावाच्या मेहुण्याशी प्रेमसंबंध होते.
एका काऊन्सिलरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला कळलं की ही एक गुंतागुंतीची केस आहे. महिला तिच्या भावाच्या मेहुण्यावर प्रेम करत होती. यापूर्वी ती तीनदा घरातून पळून गेली होती आणि प्रत्येक वेळी वडीलधाऱ्यांनी आपली इज्जत आणि तिच्या मुलांचे भविष्य वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला.
महिलेने सांगितलं की, तिचा नवरा नेहमीच त्याच्या कामात व्यस्त असायचा. त्याच्याकडे तिच्यासाठी घर नव्हतं आणि वेळही नव्हता. तो तिला घर चालवण्यासाठी पैसेही देत नव्हता आणि ती परिस्थितीमुळे निराश झाली होती. हेल्पलाइन अधिकाऱ्यांनी या जोडप्याला समजावून सांगितलं.
महिला घरी परतण्यास तयार नव्हती. तिच्या पतीने स्वतः मुलांची काळजी घेण्याचं आश्वासन दिल्यावर ती घरी परतण्यास तयार झाली. एका काऊन्सिलरने सांगितलं की, दोघांमध्ये अखेर चर्चा झाली. दोघांनीही त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.