डेहराडून - प्रत्यक्षात स्त्री असूनही पुरुष असल्याचा बनाव रचून केवळ हुंड्यासाठी दोन महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक करणा-या स्त्रीरूपातील एका तोतया नवरदेवाला उत्तराखंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील एका पत्नीचा हुंडा दिला नाही म्हणून या स्त्रीरूपातील बनावट नवरदेवाने खूप मानसिक छळही केला. नैनितालचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जमनेय खंडुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठकसेन महिलेचे नाव कृष्णा सेन ऊर्फ स्विटी असे असून, ती उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील धामपूर गावात वास्तव्याला आहे.पोलिसांनी सांगितले की, कृष्णाचे वागणे व दिसणे हे पुरुषी धाटणीचे असल्याने ती प्रत्यक्षातही आपण पुरुषच असल्याचे लोकांना भासविते. कृष्णाने फेसबुकवर 2013 साली अकाऊंट उघडून आपली पुरुषी थाटाची अनेक छायाचित्रे या अकाऊंटवर प्रसिद्ध केली. फेसबुकच्या माध्यमातून तिने दोन मुलींशी मैत्री केली व त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघींशी तिने विवाहसुद्धा केला. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या हल्दवानी येथील काठगोदाम भागातल्या एका मुलीला 2014साली कृष्णा भेटली. अलिगढ येथील सीएलएफ बल्बच्या एका उद्योजकाचा आपण मुलगा असल्याची बतावणी करत कृष्णाने त्या मुलीशी विवाह केला. त्यानंतर आपल्या पत्नीला या कथित स्त्रीरुपातील नवरदेवाने हुंड्यासाठी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कृष्णाने कालाधुंगी शहरातल्या एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले व तिच्याशीसुद्धा विवाहबद्ध झाली. कहर म्हणजे कृष्णाने जो पहिला विवाह केला होता त्याला ही दुसरी तरुणी हजर होती. कृष्णा इतकी निर्ढावलेली होती की, तिने हल्दवानी भागामधील तिकोनिया भागात एक खोली भाड्याने घेऊन तिथे आपल्या दोन्ही पत्नींना एकत्र नांदवायला सुरुवात केली.कालाधुंगी येथील दुस-या पत्नीला कृष्णा पुरुष नाही हे कळून चुकले होते. पण पैशाचे आमिष दाखवून कृष्णाने तिचे तोंड बंद केले. मात्र काठगोदाम येथील मुलीने मात्र कृष्णाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर कृष्णाला अटक करण्यात आली.लहानपणापासून टॉमबॉयअटकेनंतर पोलिसांना दिलेल्या जबानीत कृष्णाने सांगितले की, लहानपणापासून आपण टॉमबॉय आहोत व स्वत:ला मुलगाच समजते. त्यामुळेच पुरुषांच्या पद्धतीने हेअरकट करून घेतला होता. मोटारसायकल चालवायला शिकले तसेच सिगारेटही ओढू लागले. लग्न झाल्यावर तिने या दोन्ही पत्नींना आपल्या शरीराला स्पर्श करायला लावला. सेक्स टॉइजच्या माध्यमातून लैंगिक संबंधही राखले. पोलीस आता कृष्णा सेन हिच्या कुटुंबीयांचीही चौकशीही करत आहेत.
तोतया पुरुष बनून 'तिनं' केला दोघींशी विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 21:18 IST