शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

आईच्या शेवटच्या इच्छेसाठी लेकीने ICU मध्ये बांधली लग्नगाठ अन् 2 तासांत झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 20:21 IST

रुग्णालयात एका आजारी आईने शेवटच्या क्षणी आपल्या लेकीचे लग्न लगेचच करण्याची अट कुटुंबियांसमोर ठेवली.

बिहारमधील गया येथील एका खासगी रुग्णालयात एक अनोखं लग्न पाहायला मिळालं. अनेकदा तुम्ही फक्त चित्रपटांमध्येच हा प्रकार पाहिला असेल, पण गयामध्ये खऱ्या आयुष्यातही घटना घडली. रुग्णालयात एका आजारी आईने शेवटच्या क्षणी आपल्या लेकीचे लग्न लगेचच करण्याची अट कुटुंबियांसमोर ठेवली. यानंतर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्येच आईसमोरच विवाह झाला. रविवारी दोन तासांनंतर महिलेचा मृत्यू झाला. 

आशा सिंह मोड मॅजिस्ट्रेट कॉलनीजवळील अर्श हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या पूनम कुमारी वर्मा यांनी आपली मुलगी चांदनी हिने त्या जिवंत असतानाच लग्न करावं अशी अट आपल्या कुटुंबीयांसमोर ठेवली. पूनम कुमारी वर्मा अनेक दिवसांपासून आजारी होत्या. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला अर्श रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगताना कधीही मृत्यू होऊ शकतो, असे सांगितले. 

दाखल झालेल्या रुग्ण पूनम कुमारी वर्मा या ललन कुमार यांच्या पत्नी आहेत, जे जिल्ह्यातील गुरु ब्लॉकमधील बाली गावातील रहिवासी आहे. पूनम कुमारी वर्माच्या नातेवाईकांनी सांगितले की, चांदनी कुमारी हिचा 26 डिसेंबर रोजी सुमित गौरव याच्याशी लग्न झालं. मुलीच्या आईच्या आग्रहास्तव दोघांनी लग्नाच्या ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधी लग्न केले. लग्नानंतर अवघ्या दोन तासांतच मुलीच्या आईचे निधन झाले. यानंतर सर्वांचे डोळे पाणावले.

पूनम कुमारी वर्मा मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एएनएम म्हणून कार्यरत होत्या आणि कोरोनाच्या काळापासून सतत आजारी होत्या. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मुलीचं लग्न झाले. या घटनेने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आले. कुटुंबीयांवर सुखासोबतच दु:खाचा डोंगरही कोसळला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नhospitalहॉस्पिटल