शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:41 IST

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशचे माजी पर्यटनमंत्री आणि कुक्षी मंतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र सिंह बघेल हे एका गंभीर आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशचे माजी पर्यटनमंत्री आणि कुक्षी मंतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र सिंह बघेल हे एका गंभीर आरोपांमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र सिंह बघेल यांचे धाकटे भाऊ देवेंद्र सिंह बघेल यांची पत्नी काम्या सिंह हिने भोपाळमधील महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये आमदार सुरेंद्र सिंह बघेल, त्यांची पत्नी शिल्पा सिंह बघेल, सासू चंद्रकुमारी सिंह, बहीण शितल सिंह आणि पती देवेंद्र सिंह बघेल यांच्या नावाचा समावेश आहे.

काम्या सिंह हिने सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने सांगितले की, हुंड्यामध्ये लक्झरी कार न दिल्याने मला मारहाण करण्यात आली. तसेच मला लग्नाआधी खोटी माहिती देऊन लग्न लावण्यात आलं. माझे होणारे पती देवेंद्र सिंह बघेल हे एमबीए  उत्तीर्ण असल्याचे सांगण्यात आले. मात्र ते केवळ आठवीच शिकले असल्याचे लग्नानंतर समोर आले, असा आरोप तिने केला.

या प्रकरणी भादंवि कलम ८५, ३५१ (२), ३(५) आणि हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम ३ आणि ४ अन्वये भोपाळमधील महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार सुरेंद्र सिंह बघेल हे कमलनाथ सरकार यांच्या सरकारमध्ये मध्य प्रदेशचे पर्यटनमंत्री होते. दरम्यान, कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या गुन्ह्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेस